crime 
जळगाव

अनैतिक संबंध ठेवण्यास दिला नकार..पेट्रोल टाकून महिलेस जाळले

Jalgaon Crime News : रात्री दहा वाजेच्या सुमारास सदर विवाहिता एका महिलेकडे शेतातील शेंगा तोडण्याच्या कामासाठी सांगण्यासाठी गेली होती.

सकाळ डिजिटल टीम



एरंडोल : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग आल्यामुळे ३८ वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून तिला जिवंत जाळण्याची घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास विखरण (ता.एरंडोल) येथे घडली. यामध्ये महिला गंभीर भाजली असून तीस जळगाव येथे रुग्णालयात (Jalgaon Govherment Hospital) दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी (Police) संशयीत आरोपीस अटक करून मोटर सायकल जप्त केली आहे. विवाहितेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे गावातील महिलांमध्ये (Woman) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी,की विखरण (ता.एरंडोल) येथील ३८ वर्षीय विवाहितेचे गावातील खुशाल तोताराम पाटील या ३८ वर्षीय पुरुषाशी सुमारे अठरा वर्षापासून प्रेमसंबंध होते.काल रात्री दहा वाजेच्या सुमारास सदर विवाहिता एका महिलेकडे शेतातील शेंगा तोडण्याच्या कामासाठी सांगण्यासाठी गेली होती.त्यावेळी खुशाल पाटील हा दारू पिऊन त्याठिकाणी आला आणि तू येथे का बसली असे विचारून बोलू लागला.सदर विवाहिता घरी जात असतांना खुशाल पाटील याने पुन्हा वाद घातला,आणि मोटर सायकलच्या पेट्रोल टाकीतून डब्यात पेट्रोल काढले आणि विवाहितेच्या अंगावर टाकले व पेटवून दिले.

गावातील भर रस्त्यावरच महिलेला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली.यामध्ये विवाहितेची छाती,गळा आणि पाय भाजले असून तीस नातेवाईकांनी एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालयात आणले. विवाहितेस पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

सदर विवाहिता आणि संशयित खुशाल पाटील यांच्यात सुमारे अठरा वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र सदर विवाहितेने खुशाल पाटील यास आता माझ्याशी संबंध ठेवू नको असे सांगितल्याचा राग आल्यामुळे त्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संशयित खुशाल तोताराम पाटील याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे तपास करीत आहेत. पोलिसांनी संशयित खुशाल पाटील यास ताब्यात घेवून घटनेतील मोटर सायकल जप्त केली आहे.

गावात महिलांमध्ये भिती

महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विखरण येथील दोन दिवसापुर्वी सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्ही.डी.ओ.च्या चर्चेनंतर पुन्हा दुसरी घटना घडल्यामुळे गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT