जळगाव

संतप्त नागरिकांनी थेट पालिका कार्यालयात फेकला चिखल

थेट पालिका कार्यालय गाठले व पालिकेच्या बांधकाम कार्यालयात गटारीमधील चिखल व सांडपाणी फेकून रोष व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा


फैजपूर : गेल्या काही वर्षांपासून गटारीच्या समस्येने त्रस्त असलेल्या शहरातील श्रीकृष्णनगरमधील संतप्त नागरिकांनी (Angry citizens) थेट पालिका (Municipality) कार्यालय गाठून पालिकेच्या बांधकाम विभागात गटारातील (Construction Department) चिखल फेकून संताप व्यक्त केला. यामुळे पालिकेचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.


गेल्या काही वर्षांपासून श्रीकृष्णनगरमधील नागरिक गटारींच्या समस्येने त्रस्त असल्याने पालिकेकडे वारंवार अर्ज करूनही पालिकेकडून उपाययोजना झाली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साथीच्या आजारांचादेखील फैलाव होत असल्याने या भागात गटारींअभावी सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने गटारींची समस्या कायम असल्याने वर्षांनुवर्षे गटारीच्या समस्येला त्रस्त असलेल्या श्रीकृष्णनगरमधील नागरिकांनी गटारीमधील चिखल व सांडपाणी बादल्यांमध्ये आणून बुधवारी साडेअकराला थेट पालिका कार्यालय गाठले व पालिकेच्या बांधकाम कार्यालयात गटारीमधील चिखल व सांडपाणी फेकून रोष व्यक्त केला. पालिकेला जाग आणण्यासाठी नागरिकांनी २७ सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्याचा इशारा या वेळी लेखी अर्जाद्वारे दिला आहे. या वेळी बांधकाम विभागाचे अभियंता मुश्तहिद फारुकी, काँग्रेस गटनेता कलीम खाँ मण्यार यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तर नगरसेवक अमोल निंबाळे यांनी नागरिकांची बाजू मांडली.


आरोग्य निरीक्षकांवर कारवाईची मागणी
फैजपूर पालिकेचे आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीची राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गटनेता शेख कुर्बान व पाच-सहा नगरसेवक मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गावातील कचरा व गटारी तुंबलेल्या गटारींची तक्रार देण्यासाठी गेले असता आरोग्य निरीक्षक चावरे यांनी नगरसेवकांसमोर अरेरावी व उद्धट भाषेचा वापर केल्याचा आरोप शेख कुर्बान यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT