Deputy Chief Minister Ajit Pawar
Deputy Chief Minister Ajit Pawar 
जळगाव

‘पोकरा’च्या अंमलबजावणीसाठी ग्राम समित्या स्थापन करा : पवार

सकाळ डिजिटल टीम

ग्रामपातळीवर असणाऱ्या ग्राम कृषी संजीवनी समितीचा सचिव म्हणून काम करण्यास ग्रामसेवक संघटनांचा विरोध आहे.


जळगाव : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत (पोकरा) (Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani scheme) पात्र शेतकऱ्यांना (Farmer Grants) अनुदान व योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्राम समित्या स्थापन (Village Committees Establishment) कराव्यात, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केली. या योजनेंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करत नसल्याने योजनेच्या लाभापासून शेतकरी बांधव वंचित असल्याबाबतचे पत्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर (District Bank President Rohini Khadse- Khewalkar) यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिले होते. या पत्राची तत्काळ दखल घेत श्री. पवार यांनी सोमवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.

या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी व ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून, तसेच ज्या जिल्ह्यांना पोकरा योजना लागू आहे, त्या सर्व जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून योजनेचा आढावा घेतला. पोकरासाठीच्या ग्रामस्तरावरील ग्राम कृषी संजीवनी समित्या लवकरात लवकर स्थापन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. ॲड. खडसे-खेवलकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह योजनेचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, राजेश कुमार, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया व अन्य जिल्ह्यांचे सीईओ या वेळी उपस्थित होते.


ग्रामसेवकांचा विरोध
ग्रामपातळीवर असणाऱ्या ग्राम कृषी संजीवनी समितीचा सचिव म्हणून काम करण्यास ग्रामसेवक संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अडचणीत येत आहेत. यावर अजित पवार यांनी बैठकीतन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी असलेले राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सचिव प्रशांत जामोदे यांच्यासमवेत चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतले. शेतकरीहिताची योजना असल्याने आपल्याला हे काम पार पडावे लागेल, असे निर्देश त्यांनी दिले.


ग्रामसेवकांची पदे भरणार
बैठकीत ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यात ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत, त्यामुळेसुद्धा अशा योजना राबविण्यात अडचणी असतात, याकडे लक्ष वेधले. त्यावरही पवार यांनी येत्या काळात लवकरच रिक्त जागांचा आढावा घेऊन ग्रामसेवकांची भरती करण्यास सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT