जळगाव

जळगाव जिल्ह्यातील नऊ डॉक्‍टरांची सेवा अधिग्रहीत...खर्च प्रशासन करणार ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव :  येथील गणपती हॉस्पिटल या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये "कोरोना'ची लक्षणे दिसून येत असलेल्या आणि गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी नऊ फिजिशियन व भूलतज्ज्ञांची सेवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिग्रहीत करण्याचे आदेश दिले आहेत. 


जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, की कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेली आयसीयू बेडची क्षमता अपूर्ण पडण्याची शक्‍यता असल्याने 13 मेस गणपती हॉस्पिटल आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये फिजिशियन व भूलतज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पुढील डॉक्‍टरांची सेवा पूर्णवेळ गणपती हॉस्पिटलसाठी अधिग्रहीत करण्यात येत आहे. 

डॉक्‍टरांची नावे व सेवा कालावधी असा 
डॉ. रवी कुकरेजा (फिजिशियन), डॉ. ललित पाटील (भूलतज्ज्ञ), 10 जे 14 जून 2020. डॉ. मनोज टोके (फिजिशियन), डॉ. हेमंत पाटील (भूलतज्ज्ञ), 15 ते 19 जून 2020. डॉ. अभिषेक फिरके, डॉ. सुनील तायडे, 20 ते 24 जून 2020. डॉ. उमंग पाटील, डॉ. कृष्णांत भोळे, 25 ते 29 जून 2020. डॉ. निखिल पाटील, डॉ वर्षा वारके, 30 जून ते 4 जुलै 2020. डॉ. किरण पाटील, डॉ. जयश्री राणे, 5 ते 9 जुलै 2020. 


डॉक्‍टरांसाठी अशा आहेत सूचना 
सेवा अधिग्रहीत केलेल्या डॉक्‍टरांनी सकाळी आठला नियुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. ड्यूटी संपल्यानंतर दुसरे पथक येईपर्यंत काम पाहावे. सेवा कालावधीत व सेवा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही क्वारंटाइन सुविधा पुरविणे, जेवण व निवासाची व्यवस्था आदींबाबतचा खर्च जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. याशिवाय सेवा कालावधीतील मानधन अदा करण्यात येईल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहितेनुसार संबंधित शिक्षेस पात्र राहतील. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT