satgaon ajintha heavy rain 
जळगाव

ढगफुटीने हाहाकार...घराला पाण्याचा वेढा पण ती दोन तास तशीच

भगवान पाटील

निंभोरी (ता. पाचोरा) : अजिंठा पर्वत रांगाच्या परिसरात ढगफुटी झाल्याने सातगाव परिसरातील सात ते आठ एकर जमीन पिकासह वाहून गेली. तसेच सातगावांमध्ये तडवी वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरल्याने भांडे, खाण्याचे धान्य वाहून गेले. एका विधवा महिलेच्या घराला चोहोबाजूंनी पुराचा वेढा असल्याने दोन तास ती महिला घरामध्ये मुलांना धरून एकटीच बसून होती. घराच्या भिंती सिमेंटच्या असल्याने, पडल्या नाही. मातीच्या असत्या तर अनर्थ घडला असता. 

अजिंठा पर्वत रांगा परिसरात गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. पावसाचा जोर वाढत जावून पाच तास जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सातगावमधील घरादारांचे नुकसान होवून घरातील भांडे, धान्य देखील वाहून गेले आहेत. पावसाने अक्राळ- विक्राळ रूप धारण करत मेघराजा बरसला. बऱ्याच दिवसांनी पावसाच्या आगमनाने सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये आनंद होता. मात्र, याच पावसाचा जोर वाढत गेल्‍याने साऱ्यांसाठी तो संकट घेवून आला.

तीन दोन तास तशीच बसली
नदीच्या काठावर रहिवासी वस्ती असल्याने, अनेकांच्या घरांमध्ये हे पाणी शिरले. यात नदी काठावर नभीशान शकील तडवी या महिलच्या घराला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. सदर महिला आपल्या लहान लेकरांना जवळ घेवून दोन तास बसून होती. आजूबाजूच्या लोकांनाही घराच्या दरवाजापर्यंत पुरामुळे पोहोचता येत नव्हते. सदर घराच्या भिंती सिमेंटच्या असल्‍याने त्या पडल्या नाहीत. मातीच्या भिंती असल्‍या तर मोठा अनर्थ घडला असता. 

संपादन : राजेश सोनवणे

डोळ्या देखत वाहिले धान्य व भांडे
तर गुलाब हुसेन तडवी यांच्या घराच्या मागच्या दरवाजाने पाणी आत घुसून, पुढच्या दरवाज्यातून बाहेर निघून गेले. त्यामुळे भांडीकुंडी, धान्य वाहून गेले. मुन्नाबाई दादाभाऊ तडवी यांच्या घरात त्यांची सुनबाई डिलिव्हरीसाठी काही दिवस बाकी असताना, घरात झोपून होती. अचानक घरात पाणी शिरल्याने तिला उठता सुद्धा येत नव्हते. मात्र दुसऱ्या घरात असलेल्या तिच्या सासुबाईंनी तात्काळ तिचा हात धरून तिला गुडघाभर पाण्यातून बाहेर काढले. याच घरातून दोन बाजरीच्या गोण्या, भांडे वाहून गेले. निसार सुलेमान तडवी, अकबर रशिद तडवी, फरिद सुलेमान तडवी, फकीरा चाँदखा तडवी, युनुस समशेर तडवी यांच्या घरातही पाणी शिरले होते. 

कपाशी अन्‌ आल्‍याचे पिक वाहिले
पावसाचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच होता. सतत पाच तास पाऊस बरसल्याने, अनेकांना नुकसानीची भिती वाटू लागली; आणि झालेही तसेच. सातगावपासून इंद्रायणी व दगडी नदी वाहते. दगडी नदीच्या काठावर तडवी वस्ती आहे. या नदीकाठी कडुबा भिकन होळेकर यांचे दोन एकर शेत असून शेतात सहा क्विंटल आले व कपाशीचे पीक लागवड केले होते. नदीतील पुराचे पाणी शेतात गेल्‍याने शेतासह दोन्ही पिके वाहून गेली. सदर शेतकऱ्याचे यात दीड लाखाच्यावर नुकसान झाल्याचे त्यांचे म्‍हणणे आहे. तसेच वसंत पुंडलिक महालपुरे यांच्या शेतातील पाच एकर कपाशीचे पीक, दोन एकर सोयाबीन वाहून गेले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT