जळगाव

साहेब...आम्हाला एकल दुकाने उघडण्याची परवागी द्या ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कोरोना काळात व्यापारी संकुलातील मुख्य रस्त्यांवर असलेली एकल दुकाने उघडण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातही व्यापारी संकुलातील एकल दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे महापौर भारती सोनवणे व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

मिशन बिगीन लॉक ओपन अंतर्गत शासनाने काही अटींच्या अधीन राहून दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. दरम्यान, व्यापारी संकुलात असलेल्या मुख्य रस्त्यावरील दुकाने उघडण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात येत आहे. मुंबई येथे उच्च न्यायालयात एका व्यावसायिकाने याबाबत याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात व्यापारी संकुलातील मुख्य रस्त्यालगत असलेली एकल दुकाने उघडण्यास मुभा दिलेली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत घेऊन जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी व महापौर भारती सोनवणे यांना निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडिया, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे आदी उपस्थित होते. 

आयुक्त कुलकर्णी यांनी हे निवेदन तत्काळ मेलद्वारे शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन देऊन शासनाकडून परवानगी मिळताच दुकाने उघडण्यास परवानगी देऊ असे सांगितले. महापौरांनी महापालिकेच्या विधी अधिकाऱ्यांकडून यावर मत मागविण्याचे सुचविले. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना देखील देण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT