sarpancha 
जळगाव

लोकनियुक्त सरपंचांचा पायउतार; ग्रामपंचायतीत ‘अविश्वास’ ठराव पारित

लोकनियुक्त सरपंचांचा पायउतार; ग्रामपंचायतीत ‘अविश्वास’ ठराव पारित

सकाळ डिजिटल टीम

अमळगाव (जळगाव) : अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्‍या जागेवर बिनविरोध निवडून आलेल्‍या लोकनियुक्‍त सरपंचावर सदस्‍यांनी अविश्‍वास ठराव मांडला. लागलीच सभा होवून आज (ता. २९) दहा विरुद्ध नऊ असा पारित झाला असून, एक सदस्य गैरहजर राहिला होता. (jalgaon-amalgaon-grampnachayat-no-confidence-motion-of-the-elected-sarpanch-was-passed)

अमळगाव (ता.अमळनेर) सरपंच व सदस्यपदाची निवडणूक तीन वर्षांपूर्वी धुमधडाक्याने झाली. यात सरपंचपद अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव होते. या निवडणुकीत वसंत मोरे यांच्या पत्नी छाया मोरे या बिनविरोध निवडून आल्या होत्या. पण गेल्या अडीच वर्षांपासून गावात विकासकामे होत नसल्याचा दहा सदस्यांनी ठपका ठेवत त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तो मंगळवारी (ता. २९) दहा विरुद्ध नऊ असा पारित झाला असून, एक सदस्य गैरहजर राहिला होता.

सदस्यांमध्ये धुसफूस

अमळगाव ग्रामपंचायतीत एकूण अकरा सदस्य असून, गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत कारभाराविषयी सदस्य समाधानी नसल्याने सदस्यांमध्ये धुसफूस सुरू होती. त्यात महिला सरपंच असल्याने त्यांचे पती कारभारात ढवळाढवळ करीत असल्याचा ठपका ठेवत व विकासकामांचा निधी पडून असूनही विकासकामे होत नसल्याचा ठपका ठेवत दहा विरुद्ध नऊ असा प्रस्ताव पारित करीत लोकनियुक्त सरपंचांना पायउतार व्हावे लागले. एक सदस्य गैरहजर राहिला होता. यासाठी पीठसीन अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ यांनी काम पाहिले तर त्यांना गावाचे तलाठी पराग पाटील यांनी मदत केली. तसेच ग्रामसेवक वाघ यांनीही कामकाजात मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात मोठी अपडेट ! शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

कोलंबियातील ८० हिप्पो वनतारामध्ये आणणार, अनंत अंबानींचा सरकारकडे प्रस्ताव

1250 Range EV : एका चार्जवर मुंबई ते दिल्ली! 'या' कारने मार्केटमध्ये उडवली खळबळ; ९५५ हॉर्सपॉवरसह १२५० किमी रेंज, किंमत...

Latest Marathi News Live Update: बंगाल निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी केंद्रीय दले कार्यरत: मतदान केल्यानंतर ममता यांचे विधान

Jamgaon News: डीजेच्या आवाजाने घाबरून पळालेल्या 27 बकऱ्या मॉर्निंग वॉककरांनी शोधून मालकाकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT