जळगाव

लपून व्हिडीओ काढला...आणि त्यानेच तिच्याजवळ मेमरीकार्ड दिले !

रईस शेख

जळगाव ः  बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी शेजारची खोली दिली. या खोलीतून बांधकाम करणार्‍या तरुणाने लपून छपून घरमालक तरुणीचा एक मिनिटाचा अश्‍लिल व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक प्रकार जळगाव शहरात समोर आला. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणी तिची आई तसेच भावासह वास्तव्यास आहे. त्याच्या घराशेजारी असलेल्या रहिवाशाचे बांधकाम सुरु आहे. सिमेंट वगैरे साहित्य ठेवण्यासाठी तरुणीच्या आईने बांधकाम कामगारांना खोली दिली. 17 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास 22 वर्षीय तरुणी घरात एकटीच होती. त्यावेळी घरात बांधकाम कामगार संशयित तरुण आसिफ बेग तरुण आला. त्याने तरुणीला मेमरी कार्ड दिले. तसेच त्यात तरुणीचे काही व्हिडीओ असल्याचे त्याने सांगितले. 


मेमरीकार्ड देणाराच निघाला संशयित
या प्रकाराने तरुणी घाबरली हा प्रकार आईला न कळविता, हा प्रकार फोनवरुन तिचे शेजारच्यांना कळविला. त्यानुसारचे शेजारचे आले. त्यांनी तरुणीला संबंधित मेमरी कार्डमधील व्हिडीओ तिच्या लॅपटॉपमध्ये तपासण्यास सांगितले असता, यात अंघोळीनंतर कपडे बदलवित असतांनाच तरुणीचा एक मिनिटाचा अश्‍लिल व्हिडीओ तयार केला असल्याचे दिसून आले. यानंतर तरुणीने या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तरुणीच्या घरी पोहचले. मेमरी कार्ड देणार्‍या आतिफ याकूब बेग वय 20 वर्ष रा. आझादनगर, पिंप्राळा हुडको याची चौकशी केली असता त्यानेच तरुणीचा अश्‍लिल व्हिडीओ बनविला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तरुणीच्या फिर्यादीवरुन आसिफ याकूब बेग या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यांनी केला तपास 
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांचे माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल, मुकेश पाटील, हेमंत कडकर, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, शांताराम पाटील या कर्मचार्‍यांनी संशयित तरुण आसिफ बेग यास अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भोई करीत आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT