जळगाव

काही सेकंदांत एटीएमचा कॅशबॉक्स बाहेर काढला, नोटा बघून दोघांनी कंटेनर गाठले !

रईस शेख

जळगाव  : गॅसकटरने एटीएम कापून त्यातील साडेचौदा लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या हरियानातून अटक केलेल्या संशयितांनी एटीएम फोडल्याचे प्रात्यक्षिक करून दाखविल्याने पोलिसही अवाक् झाले. दोघेही १६ ऑगस्टपर्यंत कोठडीत असून, गुन्ह्याचा मास्टरमाइंड कुर्शीद व चोरून नेलेल्या रोकडचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. तपासपथक संशयिताच्या शोधात हरियानात धडकले आहे. 


कोलकता ते भिवंडी अशा अडीच हजार किलोमीटरच्या चार फेऱ्या झाल्याने मास्टरमाइंड कुर्शीद मदारी सैफी याला शिवकॉलनीतील एटीएम लुटण्यासाठी सोपे वाटले. त्यानुसार त्याने योजना आखून भिवंडीकडून कोलकत्याला जात असताना, मालेगाव येथे जेवण केले. तेथून कंटेनर जळगावात शिरल्यानंतर रात्री एकच्या सुमारास त्याने शिवकॉलनीजवळ गाडी थांबविली. अवघ्या ३३ मिनिटांत त्याने एटीएम यंत्राची अतिसुरक्षित समजली जाणारी तिजोरी कागदी पुठ्ठ्याप्रमाणे कापून काढली. काही सेकंदांत त्याने एटीएमचा कॅशबॉक्स बाहेर काढला. त्यातील नोटा बघून दोघांचे डोळे विस्फारले. लगेच त्यांनी पैसे घेऊन कंटेनर गाठला व कोलकत्याला निघून गेल्याचे प्रात्यक्षिकादरम्यान दोघा भामट्यांनी तपासपथकाला सांगितले. 

एटीएम कापण्यात तरबेज 
एटीएम यंत्रासाठी आवश्‍यक ओतीव लोखंडाच्या तिजोऱ्या तयार करण्याचे कारखाने सर्व हरियानाला लागून आहेत. वेल्डिंग, कटिंगसह लेाखंडाचे काम करणारे सर्व मजूर, कामगार यात असल्याने त्यांना एटीएमच्या तिजोऱ्यांची इत्थंभूत माहिती असते. तिजोरी नेमकी कोठून कापली, तर कॅशबॉक्स हाती लागेल हे माहिती असल्याने अवघ्या २० मिनिटांत पुठ्ठ्यासारखी तिजोरी कापून ते मोकळे करतात. 

त्रुटी पथ्यावर 
महामार्गावर असलेले एटीएम यंत्र आणि बँकेची शाखा असताना तेथे सुरक्षारक्षक नसणे, स्टेट बँकेची ऑनलाइन सेन्सर प्रणाली कार्यान्वित नसणे, स्मोक अलार्म नसणे, हॉटेल, अंडा लॉऱ्यांमुळे मोकाट कुत्रे महामार्गालगत त्या बाजूला झोपलेले होते. पोलिस गाडीचे महामार्गाने निघून जाणे आदी त्रुटी या चोरट्यांच्या पथ्यावर पडल्या. 


संपादन-भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT