जळगाव

रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी औट्रम घाट रविवारी रहदारीसाठी बंद

देविदास वाणी

जळगाव ः औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ (जूना एनएच २११) या महामार्गावर चाळीसगाव (औट्रम) घाटातील साखळी क्रमांक ३७९.७६० ते ३८८.००० मधील रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. वाहतूक कोंडी व अपघात होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविणे/दुरुस्तीचे काम रविवारी (ता. ११) हाती घेण्यात येणार असल्याने एका दिवसासाठी सदरील रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.

रविवारी सर्व प्रकारच्या वाहनासाठी वळणमार्ग असे असतील ः धुळेकडून औरंगाबादकडे येणारी वाहतूक ही धुळे – मालेगांव- नांदगांव- शिउर बंगला- देवगांव रंगारी मार्गे औरंगाबाद. चाळीसगावकडून औरंगाबादकडे येणारी वाहतूक ही चाळीसगाव - नांदगांव- शिउर बंगला- देवगांव रंगारी मार्गे औरंगाबाद. 

औरंगाबाद कडून चाळीसगाव व धुळे कडे जाणारी वाहतूक ही औरंगाबाद – देवगांव रंगारी- शिउर बंगला- नांदगांव मार्गे चाळीसागांव व धुळे कडे जातील, असे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT