Bahinabai Chaudhary Memorial
Bahinabai Chaudhary Memorial 
जळगाव

PHOTO:बहिणाबाई चौधरींच्या स्मारकाची अवहेलना थांबवा-खासदार पाटील

भूषण श्रीखंडे

सुमारे तीन एकर जागेत होणारे भव्य स्मारकासाठी पाच कोटी रुपये जिल्हा विकास नियोजन निधीतून खर्च करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती.

जळगाव ः राज्याच्या साहित्यिक (Literary) क्षेत्रात अमूल्य योगदान आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या अपूर्व साहित्य निर्मितीतून जीवन जगण्याचे सार सांगणाऱ्या कवियीत्री, खानदेश कन्या तथा निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक (Bahinabai Chaudhary Memorial) २०१२ रोजी सुमारे तीन एकर जागेत आसोदा (Asoda) या त्यांच्या जन्मगावी मंजूर करण्यात आले होते. मात्र गेल्या नऊ ते दहा वर्षापासून या स्मारकाच्या कामाला आजपावेतो आवश्यक गती मिळालेली नाही.

Bahinabai Chaudhary Memorial

यामुळे खानदेशासह राज्यातील साहित्यिकांमध्ये नाराजीची वाढली असून खानदेशात बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाबाबत होत असलेली उपेक्षा मनाला वेदना देणारी आहे. याबाबत आपण आग्रही भूमिका घेत स्मारकाची उपेक्षा थांबवावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

Bahinabai Chaudhary Memorial

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांनी निरक्षर असून देखील आपल्या अमोघ वाणीतून जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या अमूल्य साहित्याची निर्मिती केली आहे. निसर्गकन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक तात्काळ पर्यटन स्थळ विकास कार्यक्रमांतर्गत अथवा ग्राम विकास निधी या योजनेतून लवकरात लवकर होणेबाबत कार्यवाही व्हावी.

Bahinabai Chaudhary Memorial

सद्यस्थितीत कवियित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाबाबत झाडेझुडपे गवत वाढल्याने स्मारकाबाबत होत असलेल्या या उदासिनतेमुळे पंचक्रोशीत व्यवस्थेविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सुमारे तीन एकर जागेत होणारे भव्य स्मारकासाठी पाच कोटी रुपये जिल्हा विकास नियोजन निधीतून खर्च करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती मात्र नंतर या कामाबाबत अक्षम्य दिरंगाई झाली.

Bahinabai Chaudhary Memorial

राज्यातील साहित्यिकांमध्ये देखील याबाबत वाढती नाराजी पाहता तातडीने आपण बहिणाबाई चौधरी स्मारकाच्या उचित गौरव साठी कार्यवाही करावी.आपण राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आग्रही भूमिका घ्यावी अशी या माध्यमातून विनंती करीत आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी कवियित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती असून यापूर्वी आपण याबाबत कार्यवाही कराल. अशी अपेक्षा खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Bahinabai Chaudhary Memorial

राज्याचे पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरे, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्याचे मुख्य सचिव,म.जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT