Orphan girl marriage sakal
जळगाव

अनाथ तरुणींचे संसार फुलविणार; शिरसोलीत लागणार पहिला विवाह

अनाथ तरुणींचे संसार फुलविणार; शिरसोलीत लागणार पहिला विवाह

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोना (Coronavirus) काळात पालक गमावलेल्या गरीब तरुणींच्या विवाहाची जबाबदारी भरारी फाउंडेशन व के. के. कॅन्सने स्वीकारली. याअंतर्गत शिरसोलीतील एका तरुणीचा विवाह १६ जूनला होत असून, तिचा संसार फुलविण्यासाठी या संस्थांचे दातृत्व सज्ज झाले आहे. (jalgaon-bharari-foundation-Orphan-girl-marriage)

जळगावातील भरारी फाउंडेशन व के.के. कॅन्सतर्फे जिल्ह्यातील कोरोना काळात अनाथ झालेल्या दहा मुलींच्या लग्नाची (Orphan girl marriage) जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. शिरसोली येथील दशरथ बुधा भिल यांचे कोरोनाने एप्रिलमध्ये निधन झाले. त्यांची कन्या शुभांगीचा विवाह १६ जूनला पाचोरा येथे होणार आहे.

अशी केली मदत

त्यानिमित्त भरारी फाउंडेशन व के.के. कॅन्सच्या सहकार्याने नववधूस मंगळवारी सोन्याचे मंगळसूत्र, दागिने, साड्या, संसाराला आवश्यक वस्तू, भांडे आणि रोख मदत व सर्व वस्तू मिळून ३० हजारांपर्यंत मदत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते देण्यात आली.

पोरके झालेल्‍यांपर्यंत पोहचा

पद्मावती मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला के.के. कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी, भरारीचे अध्यक्ष दीपक परदेशी, डॉ. स्वप्नील पाटील, अमित भाटिया, विनोद ढगे, अमर कुकरेजा, रवींद्र लढ्ढा, बाळासाहेब सूर्यवंशी, रितेश लिमडा, नीलेश जैन, दीपक विधाते, सचिन महाजन, नीलेश झोपे विक्रांत चौधरी आदी उपस्थित होते. कोरोना काळात अनेकांचे छत्र हरविले असून, पोरके झालेल्या या घटकापर्यंत पोचणे आवश्यक आहे. भरारी व के.के. कॅन्सकडून हे कार्य चोखपणे आणि नि:स्वार्थ भावनेने पार पाडले जात असल्याचे गौरवोद्‌गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यानिमित्त काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT