जळगाव

`जय श्री रामा` च्या घोषाणे मंदिरे दणाणली...पेढे वाटून आनंदोत्सव !

देविदास वाणी

जळगाव : ‘प्रभू श्रीरामचंद्रकी जय’च्या जयघोषाने बुधवारी (ता. ५) शहरासह जिल्ह्यातील श्रीराम मंदिरात भाविकांनी जयघोष केला. घंटानाद, महाआरती झाली. अयोध्येत श्रीराम मंदिरच्या भूमिपूजनानिमित्त पेढे वाटून, रांगोळ्या काढून आनंद व्यक्त करण्यात आला. 

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त ग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरातील पंचायतन उत्सवमूर्तीस पंचनद्यांच्या जलाने व पंचामृताने अभिषेक करण्यात आला. सकाळी वेदमंत्र पठण झाले. दुपारी सव्वाबाराला श्रीरामांची महाआरती केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांच्या हस्ते झाली. मंदिराचे गादीपती मंगेश महाराज, श्रीराम महाराज आदी उपस्थित होते. सायंकाळी पाचला हरिपाठ व रामपाठ, श्रीरामरक्षा स्तोत्रपठण झाले. सायंकाळी धुपारती झाली. पावणेसातला बालकीर्तनकार श्रीधर जोशी यांचे कीर्तन झाले. ॲड. सुशीलकुमार अत्रे यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सोहळ्यानिमित्त मंदिरावर रोषणाई केली होती. सोबतच मंदिर पानाफुलांनी सजविले होते. नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात दुपारी साडेबाराला दादा महाराज यांच्या हस्ते महाआरती झाली. सकाळी मूर्तीस अभिषेक करण्यात आला. 

महापौरांचा पेढे वाटून आनंदोत्सव

महापौर भारती सोनवणे यांनी घराजवळ फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव केला. नगरसेवक कैलास सोनवणे, दीप्ती चिरमाडे यांच्यासह श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, महाराणा प्रताप मित्रमंडळाचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. महापौर सौ. सोनवणे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेला भगवा झेंडा फडकवत घोषणा दिल्या. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता.  
 


संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT