central railway carrier
central railway carrier sakal
जळगाव

मालवाहतूकीचा वेग दुप्पट; मध्य रेल्वेची महिन्यात ६.३२ दशलक्ष टन वाहतूक

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ (जळगाव) : सध्या देशभरात असलेल्या कोरोनाच्या (Coronavirus lockdown) पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यात रेल्वेत प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अशा परिस्थितीत अनेक रेल्वेगाड्या (Central railway cancal train) रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, मालवाहूक सेवा सुरळीतपणे चालू असल्याने एप्रिल ते मे दरम्यान २०२१ मध्ये १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग झाली. एप्रिल ते मे २०२० दरम्यान झालेल्या ७.५५ दशलक्ष टन लोडिंगपेक्षा ती ६६.५ टक्के जास्त आहे. (jalgaon-bhusawal-Central-Railway-carries-one-month-six-million-tonnes)

रेल्वेच्या व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) च्या निरंतर प्रयत्नामुळेच देशात कोरोनाचे संकट असूनही मध्य रेल्वेने मे २०२१ या महिन्यात मालवाहतूक लोडिंगमध्ये भर पाडली आहे. मे २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ६.३२ दशलक्ष टन वाहतूक केली. ती मे २०२० मधील ४.३३ दशलक्ष टन च्या तुलनेत ४५.९ जास्त आहे.

कोळसा, लोखंडासह खतांची वाहतूक

मे २०२१ मध्ये ३.५७ दशलक्ष टन कोळसा, ०.२१ दशलक्ष टन लोह व स्टील, ०.५८ दशलक्ष टन सिमेंट, ०.८६ दशलक्ष टन कंटेनर आणि १.१० दशलक्ष टन खत, पीओएल इत्यादींचा समावेश असलेले इतर मालवाहतूक लोडिंग केली आहे. एप्रिल ते मे २०२१ या काळात मध्य रेल्वेने १२.५७ दशलक्ष टन मालवाहतूक केली. जी २०२० मधील याच कालावधीतील ७.५५ दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत ६६.५ टक्क्यांनी जास्त आहे.

भुसावळ विभागात ०.९५ दशलक्ष टन वाहतूक

मध्य रेल्वेतील १२.५७ दशलक्ष टन मालवाहतुकीत मुंबई विभाग २.८३ दशलक्ष टन, भुसावळ विभाग ०.९५ दशलक्ष टन, नागपूर विभाग ७.३० दशलक्ष टन, पुणे विभाग ०.२९ दशलक्ष टन आणि सोलापूर विभाग १.२० दशलक्ष टन लोडिंगचा समावेश आहे.

वेळेसह पैशांची बचत

रेल्वेतील मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वेत अनेक सूट-सवलतीही दिल्या जात आहेत. वेगवान मालवाहतूकीसाठी केलेल्या सुधारणेमुळे उद्योजकांच्या पैशांची बचत होते. वर्षभरात मालवाहतूकीचा वेग जवळजवळ दुप्पट झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT