bike robbery 
जळगाव

भर चौकात तोडत होते मोटारसायकलचा लॉक; पोलिसांनी अखेर त्‍यांना पकडले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी पकडले असून, दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पंधरा दिवसांपासून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या सूचनेनुसार शहर ठाण्याच्या पथकाने मोटारसायकली चोरांचा शोध सुरू केला. 
प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी शनिवारी (ता.१७) रात्री आठच्या सुमारास शहरातील चित्रा चौक, गोविंदा रिक्षा, कोर्ट चौक, गणेश कॉलनी परिसरात सापळा रचला. यात चित्रा चौकात दोन चोरटे मोटारसायकलची चोरी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोन चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. मात्र शहर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून क्रमांक नसलेल्या सात मोटारसायकली जप्त केल्या. निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ४०, रा. प्लॉट एरिया, अडावद, ता. चोपडा) आणि ज्ञानेश्वर गुलाब पाटील (२९, रा. वडगाव, ता. चोपडा) अशी संशयितांची नावे आहेत. 

निळकंठ राऊत पुण्यातील रहिवासी असून, पुण्यातून त्याने दोन दुचाकी लंपास केल्या आहेत. राऊत याला पुणे व निगडी पोलिसांनी एक वर्षासाठी हद्दपार केले असल्याने तो जळगावात राहत आहे. हस्तगत केलेल्या दोन लाख ४० हजारांच्या सात दुचाकी जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिस ठाणे, धरणगाव, यावल परिसरातून चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली. दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल धांडे आणि रतन गिते करीत आहेत. 

यांनी केली कारवाई 
शहर ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, बशीर तडवी, पोलिस नाइक अक्रम शेख, गणेश पाटील, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी ही कारवाई केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होणार, केरळ अन् महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाने दिले अपडेट

सरकारी बाबू अन् सेलिब्रिटींच्या काळी गुंतवणुकीचं बिंग फोडणाऱ्याला अटक; सहाय्यक आयुक्तांसह ५ जणांवर गुन्हे दाखल

Petrol Diesel Saving Tips : पेट्रोल-डिझेल वाजवण्याच्या 12 गोल्डन ट्रिक्स; आजच बदला 'या' सवयी, महिन्याभरात होईल हजारोंची बचत

बुकिंग केलेली गाडी आम्ही नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केली, अरबाज शेखने सांगितला किस्सा, म्हणाला, 'ऐनवेळेला निर्णय बदलला...'

Maharashtra Latest News Live : गर्भलिंग निदान प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत; आणखी दोन डॉक्टर अटकेत

SCROLL FOR NEXT