जळगाव

ओबीसी आरक्षणावरुन भाजप-काँग्रेस आमने सामने

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत रस्त्याच्या बाजूला केले

सकाळ वृत्तसेवा



भुसावळ : महाविकास आघाडी सरकारच्या (State Government) नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने (Cort) ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण (OBC political reservation) रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा (BJP) पदाधिकार्‍यांनी व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ग्रामीण रुग्णालयाजवळील पेट्रोल पंपासमोर शनिवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) देखील ओबीसी आरक्षणाबाबत भाजपला जबाबदार धरत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) पुतळ्यासमोर आंदोलन केले. (bjp congress agitators face to face over obc reservation)

भाजपाच्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्ग काही वेळेसाठी ठप्प झाला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत रस्त्याच्या बाजूला केले. सुमारे अर्धा तास आंदोलनकर्त्यांनी ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, आमदार आगे बढो, भाजपाचा विजय असो, ओबीसी की शान मे भाजपा मैदान में, आघाडी सरकार करतय काय खाली डोकं वर पाय, महाविकास आघाडीचा धिक्कार असो आदी घोषणा दिल्याने परीसर प्रसंगी दणाणला होता. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे आदींसह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. महामार्ग रोखण्यात आल्याने 20 मिनिटे वाहतूक ठप्प झाली.


आमदार सावकारेंची ठाकरे सरकारवर टीका

मराठा समाज आरक्षण असो की ओबीसी आरक्षण असो महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षितपणामुळेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप यावेळी आमदार संजय सावकारे यांनी केला. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, राजू खरारे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अमित आसोदेकर, अमोल महाजन, साकेगावचे प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे, फेकरीचे प्रशांत निकम, अजय नागराणी, सतीश सपकाळे, प्रकाश बतरा आदी सहभागी झाले.


कॉग्रेसची मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील भाजपा सरकारच जवाबदार असल्याचा ठपका ठेवत स्थानिक काँग्रेस पदाधिकार्‍यांनी यावल रस्त्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करीत मोदी सरकारविरोधात माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रसंगी भुसावळ शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग, काँग्रेस कमेटी, अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस. महिला काँग्रेस कमेटी पदाधिकार्‍यांसह काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान खान, सलीम गवळी, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ, महिला काँग्रेस अध्यक्ष यास्मीन बानो, शहर उपाध्यक्ष विलास खरात, राणी खरात, हमीदा गवळी, राजु डोंगरदिवे, महेंद्र मसाले, जॉनी गवळी, शैलेश अहिरिे, रमजान खाटीक, सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र

SCROLL FOR NEXT