जळगाव

आमदार मंगेश चव्हाणांसह ३१ जण कारागृहात रवाना !

रईस शेख

जळगाव ः शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडण्याच्या विरोधात महावितरण अधीक्षक अभियंता फारूख शेख यांच्या दालनात धुडगूस घालत शिवीगाळ करून खुर्चीवर बांधल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाणांसह ३१ संशयित पोलिस कोठडीत आहेत. सर्व संशयितांना मंगळवारी (ता. ३०) वैद्यकीय तपासणीला जिल्‍हा रुग्णालयात आणले असताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेऊन चौकशी केली. 

सकाळी अकराला गिरीश महाजन औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात पोचले; मात्र अटकेतील संशयितांना नियमित वैद्यकीय तपासणीला जिल्‍हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. बऱ्याच वेळ थांबूनही संशयित परत न असल्याने महाजन जिल्‍हा रुग्णालयात पोचले. जिल्‍हा रुग्णालय आवारातील नेत्र कक्षाबाहेर उभ्या पोलिस व्हॅनमध्ये मंगेश चव्हाण आणि महाजन यांची भेट झाली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. 

आमदार कारागृहात 
तीन दिवसांची पोलिस कोठडी पूर्ण झाल्यावर मंगळवारी आमदार मंगेश चव्हाण यांसह सर्व ३१ संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवाना केले. 

चव्हाणांचे समर्थन 
आमदार मंगेश चव्हाण यांच्या महावितरणविरोधातील आंदोलनाचे समर्थन करत शासन शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. एकतर शेतकरी संकटात सापडला आहे, पीक-पाण्याची वाईट स्थिती असून, शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आमदाराला पाच-सात दिवस अटक करून ठेवणे गैर आहे, असे महाजन म्हणाले. 

महाजनांनी घेतला सुविधांचा आढावा 
सध्या कोरोना संक्रमणाची तीव्रता वाढली असून, जिल्‍हा प्रशासनाचे नियोजन आणि जिल्‍हा रुग्णालयच्या कारभारातील विसंगतीमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले. जिल्ह्यातील मृत्यू आणि वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. या वेळी आमदार चंदू पटेल, राजूमामा भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे, अरविंद देशमुख, जिल्‍हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण उपस्थित होते. प्रत्येकानेच कोविड रुग्णांना येणाऱ्या अडचणी आणि उपलब्ध खाटा, डॉक्टर्स, स्टाफची कमरता, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्सची उपलब्धता आणि नियोजन याचे वाभाडे काढत नाराजी व्यक्त केली. गंभीर रुग्णांना बेड नाकारणे, गेटवरूनच रुग्णाला परत पाठविण्याचे प्रकार घडत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 

आवश्य वाचा- शेतकऱ्यावर आला दुष्काळात तेरावा महिना; संपूर्ण शेत जळून खाक 


वाऱ्यावरची वरात ः महाजन 
कोरोना संक्रमणात महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक आहे, डॉक्टरांचे चार महिने पगार नाहीत, स्टाफ उपलब्ध नाही, स्मशानात जागा नाही, रेमडेसिव्हिर साडेपाच हजाराला विक्री होत आहे, ८० व्हेंटिलेटर्स असून त्यापैकी निम्मेच सुरू आहेत... तरीही शासन गंभीर नाही. मंत्र्यांचे दुसरेच धंदे सुरू आहेत, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT