BJP Movement
BJP Movement 
जळगाव

मंदिरे खुली करण्यासाठी जळगावमध्ये भाजपचा शंखनाद

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : कोरोनाच्या (Corona) नावाखाली राज्यभरातील मंदिरांवर निर्बंध लादणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचा भाजपने (BJP) सोमवारी (ता. ३०) तीव्र निषेध केला. श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्रावण सोमवारचे औचित्य साधून भाजपने मंदिरे खुली करण्याच्या मगणीसाठी शंख व घंटानाद केला.


ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार सुरळीत केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरेदेखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यांत मात्र मंदिरे सुरू आहेत. म्हणूनच ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी भाजपसह आध्यात्मिक आघाडीतर्फे सोमवारी गोलाणी संकुलाजवळील हनुमान मंदिरासमोर घंटा व शंखनाद करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले.


या वेळी सांस्कृतिक आघाडीतर्फे संयोजक विशाल जाधव व अध्यक्ष भावेश पाटील यांनी पोवाडा सादर केला. जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, प्रदीप रोटे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, दीपक साखरे, प्रा. जीवन अत्तरदे, रेखा कुलकर्णी, नीला चौधरी, वंदना पाटील, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, महिला आघाडी अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT