accident 
जळगाव

संपुर्ण परिवार संपला तिथेच पुन्हा अपघात

शब्बीर खान

हिंगोणा (जळगाव) : बुरहानपुर अंकलेश्वर रस्त्यावर अडावदकडून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या मोहरदा येथील (एमपी ०९, बीसी. ३६०८) या गाडीमध्ये दहा जण एका कार्यक्रमासाठी गेले होते. हिंगोण गावाजवळ भरधाव वेगात गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्‍याने साईडला गाडी आऊटसाईड पलटी झाली.

कार्यक्रम आटोपून घराकडे जात असताना हिंगोणा (ता.यावल) गावाजवळ सदर अपघात झाला. त्यात चालकासह नऊ जण जखमी झाले असून एक गंभीर अवस्थेत आहे. जखमींना परिसरातील नागरिकांनी तात्काळ फैजपुर येथे खाचणे हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी हलवण्यात आले. फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी एपीआय प्रकाश वानखेडे यांच्या सुचनेवरून पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रवाना केले. 

वर्षभरापुर्वी येथे परिवार संपला
गतवर्षी मुलीच्या विवाहानंतर वराकडे रिसेप्शनचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना परिवारावर घाला घातला होता. तो अपघात याच जागेवर काही अंतरावर चिंचोली मेहून येथील एका गाडीला राखेचा भरुन जाणाऱ्या डंपरने ठोस दिली होती. त्यात दहा ते अकरा जण दगावले होते. त्या परिसरात ही घटना घडली असून हिंगोणा सांगवी भालोद परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली.

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: यवतमाळमध्ये भाजपला धक्का, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या नेत्याच्या पत्नीचा पराभव

Pune Nagradhyakhsa : पुण्यात फक्त अजितदादा! १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, महाविकासआघाडीचा सुपडा साफ

New Year Travel Tips: शिमला-कुल्लु-मनाली? नवीन वर्षात हिल स्टेशनला जाण्याचा विचार करत असाल तर 'या' चुका करु नका

शुभमन गिलसोबत विश्वासघात! T20 World Cup संघातून हाकलल्याचे केव्हा सांगितले? आत्ताची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update: २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार रेल्वेचे नवीन भाडे नियम

SCROLL FOR NEXT