जळगाव

नारळाच्या झाडांमागे गांजा लपवत तस्करी; पोलिसांनी केला आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

रईस शेख

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर बुलेट शोरूमजवळ पोलिसांनी ट्रक अडविला असता, यामध्ये नारळाच्या झाडांमागे गांजाची पोती लपवत हा माल जळगाव शहरात उतरविला जाणार होता. तत्पूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी ट्रकसह चालकाला अटक केली होती. गुन्ह्यातील गांजा तस्कर फरारी होते. त्यांपैकी एकाला पकडण्यात यश आले असून, आशिक मौला (पटेल) असे अटकेतील तस्कराचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. 

एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांना माहिती मिळाली, की मुक्ताईनगरजवळून जिल्ह्या‍च्या हद्दीत शिरलेल्या ट्रकमधून (एमएच ४२, टी २१२५) गांजाची तस्करी होत आहे. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रेहन, निरीक्षक विनायक लोकरे यांच्यासह उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिग पाटील, सचिन पाटील आदी पथकाने ट्रक थांबवून चौकशी केली. ट्रकची तपासणी केली असता, त्यात नारळाची झाडे असल्याचे सांगण्यात आले. सर्व झाडे खाली उतरविल्यावर ट्रकमध्ये गांजाची पोती आढळली होती.

सापळा रचून अटक

गाडीसह माल ताब्यात घेत ट्रकचालक मुक्तार अब्दुल रहीम पटेल (वय २४, रा. लोहारा, ता. अकोला) याला अटक करण्यात आली होती. गांजाचे तस्कर याच ट्रकला कार (एमएच १८, एजे २५०७)ने पायलटिंग करत होते. पोलिसांना पाहून त्यांनी धूम ठोकली. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केल्यावर बाजारभावानुसार तब्बल ३८ लाख २० हजार ४४० रुपये किमतीचा माल पोलिसांना मिळून आला. सोमवारी (ता. १) आशिक सुलेमान मौला (पटेल) याची माहिती मिळताच निरीक्षक प्रताप शिकारे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्यासह पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. 

‘त्या’ कारचा शोध सुरूच 
गांजा वाहून नेणाऱ्या ट्रकला पायलट म्हणून पुढे चालणारी कार (एमएच १८, एजे २५०७)मध्ये अरमान चिंधा पटेल, आशिक मौला-पटेल, शेख आसिफ शेख मुनाफ असे तीन तस्कर होते. या तिघांपैकी एकालाच अटक झाली असून, उर्वरित दोघांसह त्या कारचा शोध एमआयडीसी पोलिस घेत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT