NCP Leader Eknath Khadse NCP Leader Eknath Khadse
जळगाव

ओबीसी असो..की मराठा आरक्षण हे विषय केंद्राच्या अखत्यारीत

विरोधी पक्षनेत्यांनी दौरा केला; परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या पदरी काही पडलेले नाही.

सचिन जोशी


जळगाव : ओबीसी (OBC) वर्गासाठीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण (Political reservation)असो की मराठा आरक्षण (Maratha reservation), हे सर्व विषय आता केंद्र सरकारच्या (Central Government) अखत्यारीत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadse) यांनी व्यक्त केले.
(center government come under theobc maratha reservation Eknath Khadse said )

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याबद्दल खडसेंना विचारले असता ते माध्यमांशी बोलत होते. खडसे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयामुळे ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यासाठी आता नव्याने पाठपुरावा करावा लागेल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे, ही सर्वच पक्षांची भूमिका आहे. त्यासाठी संभाजीराजेंच्या नेतृत्वात पहिला मोर्चा आता काही दिवसांत काढण्यात येत आहे. मात्र, कुणाचा विरोध नाहीच तर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे, असे ते म्हणाले.

नुकसानभरपाई मिळावी
मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात वादळाने केळी भुईसपाट झाली. पालकमंत्री, विरोधी पक्षनेत्यांनी दौरा केला; परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या पदरी काही पडलेले नाही. पंतप्रधानांनी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या गुजरातचा दौरा करत एक हजार कोटींची मदत दिली. पश्‍चिम बंगाललाही ‘यास’ वादळाने झालेल्या नुकसानीसाठी ५०० कोटी दिले. मग, महाराष्ट्रालाही मदत मिळाली पाहिजे, फडणविसांनी ती मिळवून द्यावी, असेही खडसे म्हणाले.

व्यक्तीमुळे पक्ष सोडला
फडणवीस आपल्या निवासस्थानी आले, आपल्याशी संवादही साधला. त्या संदर्भात छेडले असता खडसे म्हणाले, की या संवादाचा राजकीय अर्थ काढू नये. भाजपत काही व्यक्तींमुळे आपल छळ झाला, त्यामुळे पक्ष सोडावा लागला. त्या वेळी राष्ट्रवादीने आपल्याला मानसिक आधार दिला. आता राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT