Impact.jpg 
जळगाव

जळगावात केंद्रीय पथक घेणार स्थितीचा आढावा; कोरोनाबाधितांच्या मृत्यूंबाबत "सकाळ' वृत्ताची दखल

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्गात जळगाव जिल्हा मृत्यूदराच्या रांगेत चौथ्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील वाढत्या मृत्यूदराबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापौरांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. त्यानुसार राज्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी येणारे पथक जळगावातही भेट देऊन स्थितीचे अवलोकन करणार आहे. 

शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करण्यासाठी संबंधित पथकास जिल्हा दौऱ्यावर पाठवून उपाययोजना सुचवाव्यात, अशी विनंती महापौर भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. महापौरांच्या विनंतीनंतर खासदार उन्मेष पाटील यांनी तत्काळ आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांना याबाबत अवगत केले असता महाराष्ट्रात 5 जूनला केंद्रीय पथक येणार असून, त्याचवेळी जळगाव जिल्ह्यातील स्थितीचा आढावाही घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

मृत्यूदराचा वाढता आलेख 
सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात व शहरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. पहिल्या लॉकडाउननंतर सातत्याने रुग्ण वाढत असून, वाढता मृत्यूदरही गंभीर बनला आहे. जळगाव जिल्ह्यात आजअखेर रुग्णसंख्या आठशेवर पोचली असून, तब्बल 94 मृत्यू झाले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्के असून, हा आकडा गंभीर स्थिती दर्शविणारा आहे. 

महापौरांनी केली विनंती 
या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्‍यक असून, त्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे निवेदन पाठविले आहे. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह उन्मेष पाटील यांनाही पाठविले आहे. त्याची दखल घेत राज्यात 5 जूनपासून येणारे पथक जळगावातही भेट देणार असल्याचे कळविण्यात आले आहे. 

खासदारांचे केंद्राला पत्र 
खासदार उन्मेष पाटील यांनीही या संदर्भात तत्काळ केंद्रीय आरोग्यमंत्री व आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठविले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि कोरोना उपाययोजनांचे नोडल अधिकारी लव अग्रवाल यांच्याशी त्यांनी फोनद्वारे चर्चा करून जिल्ह्याची गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. त्यानंतर केंद्रीय पथक पुन्हा महाराष्ट्रात पाठवणार असून, समितीचे अध्यक्ष श्री. कुणाल (भाप्रसे) हे जळगाव जिल्ह्यात येण्यापूर्वी आपल्याशी संपर्क करतील, अशी माहिती अग्रवाल यांनी खासदारांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT