जळगाव

खेडगाव येथील जवान हुतात्मा

खेडगाव येथील जवान हुतात्मा

सकाळ डिजिटल टीम

भडगाव (जळगाव) : खेडगाव (ता. भडगाव) येथील इंडो- तिबेटियन (आयटीबीपी) सेनेत कार्यरत असलेले जवान मंगळवारी कर्तव्य बजावताना हुतात्मा झाला. सुनील यशवंत हिरे (वय ४०) हे आसाम येथे सेवेत होते. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव खेडगाव येथे येण्याची शक्यता आहे. (jalgaon-chalisgaon-taluka-soldier-Death-aasam-service)

याबाबत जवानाच्या नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी, की खेडगाव खुर्द (ता. भडगाव) येथील सुनील यशवंत हिरे (वय ४०) हे भारतीय इंडो- तिबेटियन बटालियन २५ अर्थात आयटीबीपी सेनेत कार्यरत होते. त्यांनी पश्चिम बंगाल येथील निवडणुकीत सेवा बजावल्यानंतर ते आसाम येथील डिब्रगड येथे सध्या कार्यरत होते. दरम्यान, कर्तव्य बजावताना मंगळवारी (ता. २२) वीरमरण आले. याबाबत तालुका प्रशासनाकडे अधिकृतरीत्या काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

आठ महिन्‍यांनी होणार होते निवृत्‍त

आसामहून त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळपर्यंत खेडगाव येथे येण्याची शक्यता आहे. मात्र, यास अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकलेला नाही. जवान सुनील हिरे हे २२ वर्षांपासून देशसेवेत कार्यरत होते. पुढच्या आठ महिन्यांत ते सेवेतून निवृत्त होणार होते. मात्र, त्यांना वीरमरण आल्याने खेडगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, एक बारा वर्षांचा, तर दुसरा आठ वर्षांचा मुलगा असल्याचे त्यांचे चुलत बंधू संजय हिरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT