जळगाव

अमृत’ पाणीपुरवठा योजनेचे काम ६० दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान 

सचिन जोशी

जळगाव : तीन वर्षांपासून रखडलेले ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. जानेवारी उलटल्यानंतर आता अवघ्या ६० दिवसांतच हे काम पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. 


केंद्र सरकारच्या ८० टक्के, राज्य सरकार व स्थानिक संस्थेच्या प्रत्येकी १० टक्के निधीतून ‘अमृत’ योजनेत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम मंजूर करण्यात आले होते. पाणीपुरवठा योजनेसाठी २४९ कोटी व भुयारी गटार योजनेवर १६९ कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला. पैकी पाणीपुरवठा योजनेचे काम कार्यादेश दिल्यापासून २४ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, वर्षभर मुदतवाढ देऊनही ते अद्याप पूर्ण झालेले नाही. 

असमन्वयातून रखडले काम 
तीन वर्षांपासून (नोव्हेंबर २०१७) पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. त्यात वारंवार आलेल्या काही तांत्रिक अडचणी, मक्तेदार एजन्सीसह महापालिका व कामाचे तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या तिन्ही यंत्रणांमधील असमन्वयाने हे काम रखडले. अद्यापही पाणीपुरवठा योजनेचे ६० ते ६५ टक्केच काम होऊ शकले आहे. 

केंद्र सरकारचे निर्देश 
एकीकडे हे काम रखडलेले असताना केंद्र सरकारने मात्र ते पूर्ण करण्यासाठी आता मार्च २०२१ पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे उर्वरित ४० टक्के काम आता येणाऱ्या ६० दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान या यंत्रणांपुढे आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच पायाभूत सुविधांच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली, तशी ती या कामांनाही मिळाली. मात्र, तरीही काम पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी आता केंद्राचे निर्देशच आल्याने या यंत्रणांसमोरील अडचण वाढली आहे. 

भुयारी गटारांचे कामही थंड 
दुसरीकडे सहा महिन्यांपूर्वी भुयारी गटारांचे पहिल्या टप्प्यातील कामही वेगाने हाती घेण्यात आले. मात्र, तेदेखील गेल्या महिनाभरापासून थंड बस्त्यात गेले आहे. शिवाय, या दोन्ही कामांमुळे शहरातील प्रमुख, उपरस्त्यांची वाट लागली, ती वेगळीच. त्यामुळे ही दोन्ही कामे जळगावकरांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत असून, ती कधी पूर्ण होऊन शहरवासीयांचा जीव भांड्यात पडतो, त्याचीच प्रतीक्षा आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT