car theft  
जळगाव

कार चोरण्यासाठी चक्क..रुग्णवाहिकेचा वापर

Jalgaon Crime News : दोन दिवसांनंतर परत आल्यावर भुसावळला त्यांच्या घरी कारने जात असताना त्यांना कारचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळले.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर रस्त्यावर रात्रीच्या वेळी रुग्णवाहिकेतून (Ambulance) येत चारचाकी चोरीचा प्रयत्न (Car Theft) करणाऱ्या दोघा भामट्यांना शहर पोलिसांनी अटक केली. अटकेतील संशयितांनी छाबडा एजन्सीज बाहेर उभी कार चोरण्यासाठी वापर केलेली रुग्णवाहिका जप्त करण्यात आली. भुसावळ येथील कुणाल हातकर छाबडा सर्जिकल एजन्सीजमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी हटकर मालकासह बुधवारी (ता. २५) कारने (एमएच १९ बीजे ०५५४) गोल्ड सिटी हॉस्पिटलसमोर लावून इंदूरला गेले होते. दोन दिवसांनंतर परत आल्यावर भुसावळला त्यांच्या घरी कारने जात असताना त्यांना कारचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळले. तसेच दरवाजाचे हँडल वाकलेले, व्हायफर काढून टाकलेले आढळून आले.


सीसीटीव्हीत चोरटे कैद
श्री. हातकर यांनी घडला प्रकार दुकान मालक विनय चौधरी यांना सांगितला. त्यांनी दुकानाबाहेर लागलेल्या सीसीटीव्हीची धुंडाळणी केल्यावर रुग्णवाहिकेमधून आलेले दोन भामटे कार उघडताना आढळून आले. त्यावरून कुणाल हातकर यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.


गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अटकेत
हातकर यांची तक्रार ऐकून घेतल्यावर निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, राजकुमार चव्हाण, उमेश भांडारकर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. शहरातील भजे गल्लीत संशयिताची रुग्णवाहिका आढळून आली. दोघांना ताब्यात घेत चौकशी केल्यावर योगेश बाजड (रा. गेंदालाल मील) व दिनेश राठोड (रा. वाघनगर) या दोघांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT