Crime 
जळगाव

गोळीबाराने जळगाव पुन्हा हादरले..कांचननगर परिसरात घडली घटना

Jalgaon Crime News : जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीमूुळे जळगावकरांची चिंता वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जळगाव जिल्ह्यात तसेच शहरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज पुन्हा जळगाव शहरातील कांचनगर परिसरात सकाळी आठच्या सुमारास गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जळगाव शहरासह कांचनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी भुसावळ येथील खुनाच्या घटनेतील संशयीताची जामिनावर सुटका झाल्यावर भुसावळ कडे जातांना नशिराबाद जवळ दोन जणांनी गोळीबार व शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना ताजी होती. त्यातच आज सकाळी कांचननगर येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीमूळे जळगावकरांची चिंता वाढेली आहे. या घटनेत कोण जखमी झाले, कोणामध्ये वाद झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

गोळीबाराच्या घटनेने खळबळ

जळगाव शहरात पंधरा दिवसापूर्वी दोन खून, कांचनगर परिसरातून कांचनगर परिसरातून अट्टल गुन्हेगाराला पिस्तुलसह अटक अशा घटना घडल्या. त्यात कांचनगर परिसरात टोळक्यांचे वाद देखील नेहमी होत असून त्यातूनच आजची घटना घडली असल्याची शंका वर्तवली जात आहे. पंरतू वारंवार होणाऱ्या या घटनांमूळे जळगाव शहरात मात्र खळबळ उडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT