jalgaon rain sakal
जळगाव

जळगाव शहरासह परिसरात जलधारा; दमदार पावसाची प्रतीक्षा

जळगाव शहरासह परिसरात जलधारा; दमदार पावसाची प्रतीक्षा

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जूनचा पंधरवडा निघून गेल्यानंतरही केवळ वर्दी देऊन जाणाऱ्या मॉन्सूनचा पाऊस (Mansoon rain) जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे बरसलाच नाही. अशा स्थितीत जीवघेण्या उकाड्याने त्रस्त नागरिकांना मंगळवारी पावसाने लावलेल्या हजेरीने तात्पुरता का होईना दिलासा मिळाला. (jalgaon-city-rain-come-but-Waiting-for-heavy-rain)

राज्यात कोकणसह मुंबईत (Mumbai rain) मॉन्सूनच्या पावसाने गेल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावली. अल्पावधीत मॉन्सूनच्या पावसाने राज्य व्यापले. मराठवाडा, विदर्भातही पाऊस सुरू झाला. मात्र, उत्तर महाराष्ट्राला अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

आर्द्रता, उकाडा वाढला

गेल्या आठवड्यापासून मॉन्सूनची वर्दी देणारे ढग आकाशात जमा होत आहेत. वातावरणातील आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे उष्म्याने त्रस्त नागरिकांना उकाड्यानेही हैराण केले आहे.

मंगळवारी तुरळक हजेरी

मंगळवारी दुपारी पावसाने शहरासह परिसरात तुरळक हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास ढगांनी गर्दी केली. काही प्रमाणात वाराही सुटला आणि जोरदार पावसाला सुरवात झाली. दहा-पंधरा मिनिटे चांगला पाऊस झाला. मात्र, नंतर पाऊस पुन्हा गायब होऊन ऊनही पडले. या पावसाने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, या तुरळक पावसाने पुन्हा उकाड्यात वाढ झाली.

दमदार पावसाची प्रतीक्षा

तुरळक पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याऐवजी उकाडा वाढला. त्यामुळे जिल्ह्यात आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. एखाद्या भागापुरता नव्हे, तर सार्वत्र पाऊस पडण्याची वाट शेतकऱ्यांसह नागरिक पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT