child line
child line 
जळगाव

जळगावात आता मुले त्यांच्या समस्या सांगतील ‘चाइल्ड लाइन’ला 

सचिन जोशी

जळगाव : अल्पवयीन अर्थात ० ते १८ या वयोगटातील मुले-मुली त्यांना असलेल्या कोणत्याही प्रकारच्या समस्या ‘चाइल्ड लाइन १०९८’वर शेअर करू शकतील. याद्वारे ओपन हाउस उपक्रमास  सुरवात करण्यात आली आहे. 

आवश्य वाचा- राज्यभरात आजपासून अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम 

अल्पवयीन मुला-मुलींना अनेकदा लैंगिक शोषण, घरगुती हिंसाचार, बालविवाह, बालमजुरी या समस्यांना सामोरे जावे लागते. काही हरवलेल्या मुलांना सांभाळ आणि सुरक्षिततेची गरज असते. त्यांच्यासाठी चाइल्ड लाइन १०९८ काम करते. याबाबतची माहिती समुपदेशिका वृषाली जोशी यांनी जळगाव चाइल्ड लाइन आयोजित ओपन हाउस कार्यक्रमात दिली. सुरवातीला मुलांचे खेळ घेण्यात आले, गीतांच्या माध्यमातून त्यांना मनोरंजनात्मक समुपदेशन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास २८ मुली व ४२ मुले तसेच पालक उपस्थित होते. 

‘सेफ टच’बाबत मार्गदर्शन 
मुला-मुलींचे गट विभागून त्यांना ‘सेफ टच, अनसेफ टच’ याबाबतची सविस्तर माहिती दिली गेली. भानुदास माळी व हृषीकेश वाघ या मेहरूण परिसरातील तरुणांनी तसेच नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सहकार्य केले. या वेळी चाइल्ड लाइनचे टीम मेंबर्स कुणाल शुक्ला, रोहन सोनगडा, हर्षल दुसाने, वैष्णवी खैरनार उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वयक भानुदास येवलेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

संपादन- भूषण श्रीखंडे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Blast: "माझ्या पत्नीचा मृतदेह तिच्या अंगठीने ओळखला"; डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रिद्धीच्या पतीचा दुःखद अनुभव

Pushpa 2: 'पुष्पा-2'मध्ये समंथा नाही तर 'ही' अभिनेत्री करणार आयटम साँगवर डान्स? चर्चांना उधाण

सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले, 4 जणांचा मृत्यू

Indapur Crime News : इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञाताने केला हल्ला

Latest Marathi News Live Update: पुणे पोर्श प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचा तपास सुरु: पुणे पोलीस आयुक्त

SCROLL FOR NEXT