जळगाव

गावासह जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करा !

६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले त्यामुळे या गावांमध्ये दिलासादायक चित्र आहे.

देविदास वाणी

जळगाव ः कोरोना महामारीने (Corona epidemic) आपल्याला जखडून ठेवले आहे. त्यामुळे विकासकामे करण्यास कोरोनाचा अडथळा येत आहे. कोरोनाने आपल्या अनेक स्वजनांना हिरावून घेतले आहे. त्याला आता आपण हरविले नाही तर आपल्या पूढील पिढ्यांना तो खावून टाकेल. यामुळे कोरोनाचा एकदाच का सोक्षमोक्ष करून त्याला कायमचा हद्दपार करा. कोरोना मुक्तीची चळवळ तयार करून गावासह जिल्ह्याला, राज्याला कोरोन मुक्त (Coron free) करण्याचा संकल्प कराच असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्स (Video conference)द्वारे झालेल्या संवादात दिला. कोरोनामुक्त गाव अभियाना अंतर्गत ते सरपंचाशी संवाद साधत होते.
(cm uddhav thackerays appeal sarpanch district with villages corona free)

जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीडीओ कॉन्फरन्स झाला. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, यावल पंचायत समितीचे एच.एम.तडवी, पहूरपेठ (ता. जामनेर) येथील सरपंच नीता रामेश्‍वर पाटील, सारोळा खुर्दचे (ता. पाचोरा) सरपंच सीमा शिवदास पाटील, विरवाडे (मालापूर) (ता. चोपडा) येथील विशाल म्हाळके, मालोद (ता .यावल) येथील हसीना सिराज तडवी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरेंनी संवाद साधला

कोरोना महामारीला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील एक हजार १५७ ग्रामपंचायतींपैकी एक हजार ९४ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. त्यामुळे या गावांमध्ये एकही बाधित आढळला नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोनामुक्त गाव अभियानात जिल्ह्यातील वरील सरपंचांशी मुख्यमंत्री ठाकरेंनी संवाद साधला.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT