जळगाव

जळगावात आता सलग पाच दिवस व्यापारी संकुलने खुली राहणार !

देविदास वाणी

 
जळगाव ः शहरातील व्यापारी संकूले आता सोमवार ते शुक्रवार अशी सलग पाच दिवसांसाठी सुरू राहतील. शनिवार, रविवार दोन दिवस दुकाने बंद असतील, असे आदेश महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आज काढले आले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

कोरोना संसर्गामुळे चार महिन्यापासून जळगाव शहरातील व्यापारी संकुले बंद होती. व्यापारी असोसिएशनने जिल्हाधिकारी, आयुक्त, पालकमंत्र्यांना व्यापारी संकुले सुर करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. यामुळे ४ आॅगस्टला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासोबत व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यात एक दिवसाआड व्यापारी संकुले सुरू ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार रविवार, सोमवार, बुध, शुक्रवार अशी चार दिवस व्यापारी संकुले सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. तर मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी तीन दिवस व्यापारी संकुले बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार व्यापारी अटी, शर्तीचे पालन करीत होता. 


व्यापाऱ्यांना सलग सहा दिवस दुकाने सुरू ठेवावयाची होती. त्यासाठी त्यांना पाठपुरावा सुरू होता. यामुळे मिशन बिगेन अगेन अंतर्गत महापालिकेच्या आयुक्तांनी आज सोमवार ते शुक्रवार सलग दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार आहे. यामध्ये दूध, किराणा,औषधी या दुकानांना वगळण्यात आले आहे. असे असले तरी व्यापाऱ्यांना नियम, अटींचे पालन करावे लागणार आहे. वरील आदेश हे सोमवार पासून लागू होणार आहे. 
व्यापारी, नागरिकांना कोरोना बाबत नियमांचे पालन न केल्या दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. 

असे आहेत नियम 
* कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम बंद 
* सामाजिक अंतर राखूनच व्यवहार करावे 
* दुकानात एकावेळी ५ ग्राहक हवे 
* सर्वांना मास्कचा वापर गरजेचा 
* नागरिकांनी जवळच्या मार्केटमध्ये जावूनच खरेदी करावी 
* खरेदीसाठी मोटोजाईज्ड वेईकल वापरू नये 
 

सलग दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश निघाल्याचे स्वागत आहे. वेळेत एक तासाने वाढ केली पाहिजे होती. एक दिवसाआड बंदमुळे ग्राहकांचाही हिरमोड होत होता. आता मात्र सलग पाच दिवस दुकाने सुरू ठेवण्यात येणार असल्याने समाधान आहे. 

रमेश मतानी, अध्यक्ष 
सेंट्रल फुले मार्केट व्यापारी असोसिएशन 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

LSG vs DC Live: अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले? रिषभ पंतने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, अक्षर पटेलने जिंकला टॉस अन्...

RTE Admission : ‘आरटीई’साठी २ लाख ८८ हजार अर्ज; ऑनलाइन सोडत, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे होणार जाहीर

तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत येतोय झी मराठीचा नायक; नावही तेच; प्रेक्षकांनी पाहताच ओळखलं

SCROLL FOR NEXT