जळगाव

ताजिया नाही, मिरवणूक नाही, तरी विधायक कामातून साजरा केला मोहरम I 

रईस शेख

जळगाव : कोरोना मुळे सर्व धर्माच्या सणांवर विरजन पडले असून घरातच बसून आपल्सया पद्णधतीने सण साजरा करावा लागत आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून आलेल्या नियमांचे पालन करून वेगळ्या पद्धतीने सण साजरा करण्याचा काम पिंप्राळा हुडकोतील मुस्लीम समाजाने करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात महिलांचा देखील सहभाग होता.  

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील साबरी फाऊंडेशन तर्फे अगळावेगळा मोहरम सण साजरा करण्यात आला. मिरवणुका, ताजियांना परवानगी नसल्याने यंदा परिसरातील तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करुन दुपार पर्यंत ६१ बॉटल रक्ताचे संकलन करण्यात आले. विषेश म्हणजे महिलांनीही यात रक्तदान करुन योगदान दिले. 

शहरातील साबरी फाऊंडेशन तर्फे मेाहरम सणाचे औचित्य साधून यंदा कोरोना महामारी आणि रक्त तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी पिंप्राळा हुडको परीसरातील तरुणांना आवाहन करण्यात आले होते. यावेळी हाजी करीम सालार, मुफ्ती हारुन नदवी, नदिम मलीक आदींची उपस्थीती लाभली. संस्थेचे हुसैन साबरी, फिरेाज शेख, बशीर पिंजारी, चिराग पिंजारी, युनूस पिंजारी, रेाशन पिंजारी, मुबारक सैय्यद, मुकीम खान आदी पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. इंडीयन रेडक्रॉस तर्फे आयेाजकाचे आभार व्यक्त करण्यात आले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT