जळगाव

दिलासादायक...सोमवारचा दिवस "कोरोना' मृत्यूविना,  15 रुग्णांना "डिस्चार्ज' 

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या 15 जणांना कोरोनामुक्त झाल्याने सोमवारी सुट्टी देण्यात आली. सर्वांना महापौर भारती सोनवणे यांनी पुढील निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. दररोज रुग्णसंख्येत वाढ आणि मृत्यूच्या मालिकेत आजचा दिवस जळगाव जिल्ह्यासाठी दिलासा देणारा ठरला. आज दिवसभरात कोरोनाने एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही.

गेल्या दोन महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतच आहे. त्यातही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे. दररोज मृत्यू होत असताना आरोग्य यंत्रणा टीकेचे लक्ष्य होत होती. गेल्या बुधवारी तर बाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यावरून डीनची बदली व नवीन नियुक्तीही झाली. या नकारात्मक स्थितीत आज जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे वृत्त आले. 

महापौरांनी संवाद साधला 
महापौरांनी कोरोनामुक्त झालेल्यांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, आर्किटेक्‍ट शिरीष बर्वे, दिलीप तिवारी, डॉ. राम रावलानी, डॉ. शिरीष ठुसे, डॉ. सायली पवार, डॉ. पल्लवी नारखेडे, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. हेमलता नेवे, डॉ. पंकज नेवे, डॉ. करुणा भालेराव आदी उपस्थित होते. 

रुग्णांनी मानले आभार 
कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांशी दररोज संपर्क करून महापौर माहिती जाणून घेत होत्या. रुग्णांना काही असुविधा असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कुटुंबाप्रमाणे काळजी घेतल्याने सर्व रुग्णांनी महापौरांचे आभार मानले. 



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT