जळगाव

संशयित रुग्णांचे "सॅम्पल' गहाळ...अन्‌ आरोग्य मंत्री संतप्त ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : जिल्हा कोविड रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या 32 रुग्णांचे सॅम्पल गहाळ झाल्याचा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या बैठकीत केला. हा गलथानपणा उघड होताच मंत्री टोपे संतप्त झाले व त्यांनी ताबडतोब या रुग्णांचे पुन्हा सॅम्पल घेण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. 

जळगाव जिल्ह्यात "कोविड'मुळे 102 रुग्णांचा मृत्यू झाला. जळगावचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यूदरापेक्षा चार पट आहे. देशाचा मृत्यूदर 3.1 टक्के आहे; तर जळगावचा तब्बल 12 टक्के असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच जळगाव येथील बैठकीत सांगितले. जळगाव जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आज आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करून "कोविड' रुग्ण स्थितीची माहिती घेतली. 

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील वाढत्या मृत्यूदराबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली. बैठकीबाबत माहिती देताना खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले, की या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा गलथानपणा उघड झाला, जिल्ह्यातील 32 कोविड संशयिताचे "स्वॅब'चे अहवालच गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत आपण या बैठकीत प्रश्‍न उपस्थित केला होता. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा गलथानपणा सुरू आहे. तब्बल 32 रुग्णांचे "स्वॅब' चे सॅम्पलच गहाळ झाले आहे. त्याचा कोणताही अहवालही आलेला नाही. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनानेही हे मान्य केले आहे. मग त्या अहवाल गहाळ झालेल्या रुग्णांचे काय? रुग्णालय नागरिकांशी जीवनाशी खेळ करीत असल्याचा प्रश्‍नही खासदारांनी बैठकीत मांडला 

आरोग्यमंत्री संतप्त 
"कोविड' संशयित रुग्णांचे अहवाल गहाळ झाल्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे संतप्त झाले. त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी "ट्रेस' होत नसल्याचे सांगितले, त्यावर मंत्री अधिकच संतप्त झाले. ही गंभीर बाब असल्याचे श्री. टोपे यांनी स्पष्ट केले. आपण त्या रुग्णांचे रिसॅम्पल घेतले काय, असा प्रश्‍न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी नकार देताच. मंत्री टोपे यांनी ताबडतोब संबंधित रुग्णांचे रिसॅम्पल घेऊन ताबडतोब तपासणीला पाठविण्याचे आदेश दिले. असा गलथानपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबीही आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT