Patient Patient
जळगाव

जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या तीनशेच्या टप्प्यात

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम



जळगाव : जिल्ह्यात कोरोना (corona) संसर्गाचा उतरता आलेख कायम आहे. बुधवारी (ता. ७) प्राप्त अहवालानुसार दिवसभरात नवे १५ बाधित (Patient) आढळून आले, तर बरे होणाऱ्यांचा आकडा ५० होता. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती आता तीनशेच्या टप्प्यात आली आहे. (jalgaon corona active patient number three hundred stages)

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. मार्च व एप्रिलपर्यंत ‘पीक’वर असलेला संसर्ग आता जुलैत नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. बुधवारी चार हजार ७४२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी केवळ १५ जण बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता एक लाख ४२ हजार ४१० झाली आहे. दिवसभरात ५० रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ५०६ वर पोचला आहे.

मृत्यूची नोंद नाही

सलग चौथ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून, आता अवघे ३३१ सक्रिय रुग्ण राहिले. पैकी ९९ लक्षणे नसलेले, तर २३२ लक्षणे असलेले रुग्ण आहेत.

...असे आढळले रुग्ण
बुधवारी जळगाव शहरात चार, भुसावळ तालुका तीन, अमळनेर एक, चाळीसगाव सहा, असे रुग्ण आढळून आले. अन्य १२ तालुक्यांत एकाही रुग्णाची नोंद नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: शासनाची मोठी कारवाई! ‘लाडक्या बहिणी’ कायमच्या अपात्र; घेतलेले पैसेही परत द्यावे लागणार, पण कुणाला?

Sports: क्रिकेटपटू भाविका अहिरे अंडर १९ महिला संघाच्या कर्णधारपदी; दोंडाईचाचे आजोळ, नाशिकची कन्या

Nanded: कोरोनात आई-वडिलांचे छत्र हरपले; जिद्दीने वैष्णवी बनली डॉक्टर, मेहनतीच्या जोरावर एमबीबीएस केलं पूर्ण

आमची बाळं कुठं आहेत? घरातल्या कुणाशीच चेहरा जुळेना; IVFद्वारे जुळ्या मुलींचा जन्म, DNA रिपोर्ट पाहून दाम्पत्याला धक्का

Latest Live Updates Marathi: चोपड्यात आयसर चालकावर हल्ला; गोवंश वाहतुकीचा आरोप करत गाडीची तोडफोड

SCROLL FOR NEXT