जळगाव

जळगाव जिल्ह्यात दिलासादायक चित्र; कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्याकडे 

भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाबत काही दिवसांपासून दिलासा देणारी कोरोना बाधितांची आकडेवारी येत आहे. त्यात दररोज नविन बाधितांपेक्षा कोरोना मुक्त होवून घरी जाणाऱयांची संख्या चांगली आहे. त्यात आता कोरोनामुळे मृत्‍यू होणाऱ्यांची संख्या कमी झालेला दिसत असून आज दोन बाधितांचा मृत्यू झाला. तर आज जिल्हा प्रशासनाच्या अहवालनुसार नविन बाधित २७६ तर ५०१ कोरोना मुक्त होवून घरी गेले आहे.

आवर्जून वाचा- रेल्वेने दिला फुकट्या प्रवाशांना दणका ! वसुल केला ६४ हजारांचा दंड

   
जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत असून रुग्ण बरे होवून घरी जाणे तसेच मृत्याचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसत आहे. परंतू रोजचा बाधितांचा आकडा दिड-दोन महिन्यापूर्वी पेक्षा कमी असला तरी दररोज तीनशे पर्यंत येणारे आकडेवारी चितांजणक आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जरी कमी झाला असला तरी काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवारी दिवसभरात २७६ नवे बाधित रुग्‍ण आढळल्‍याने एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ७११ वर पोचली आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट राहिले असून बरे होणाऱ्यांची संख्या ५०१ आहे. त्यामुळे आता एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ४४ हजार ३०२ वर पोचली आहे, तर सद्यःस्‍थितीत चार हजार ४६५ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. 

बरे होणाऱयांची संख्या ४४ हजार पार
गेल्या पंधरा दिवसापासून नविन बाधितांपेक्षा कोरोना मुक्त होवून घरी जाणाऱया रुग्णांची संख्या दुप्पट ते तिप्पटने वाढलेली आहे. त्यामुळे दिलासादाय चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. आज ५०१ कोरोना मुक्त रुग्ण घरी गेल्याने जळगाव जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४४ हजार पार गेली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८९.१२ टक्यावर आला आहे.

जामनेर हॉट स्पॉट
जामनेर शहरात सलग दोन दिवसापासून शंभरी पार कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जामनेर शहरातील परिस्थीती चिंताजणक झाली असून कोरोनाचा संसर्ग जामनेरात वाढत आहे. नागरिकांची बाजारात होणारी गर्दी तसेच काळजी न घेणे हे कारण समोर आले असून जामनेर मधील शासकीय यंत्रणेला यावर नियंत्रण आणण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे.  


असे आढळले रुग्‍ण 
जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ३१, अमळनेर १०, चोपडा ६, पाचोरा १, भडगाव १, धरणगाव ३, यावल ३, एरंडोल ५, जामनेर १०६, रावेर १०,  चाळीसगाव ८, मुक्‍ताईनगर २ आणि इतर जिल्ह्यांतील ६ रुग्‍णाचा समावेश आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT