जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘कोरोना’चा उद्रेक;  दोन दिवसांत साडेतेराशे नवीन रुग्ण 

सचिन जोशी

जळगाव  : जिल्ह्यात ‘कोरोना’चा उद्रेक सुरूच आहे. मंगळवारी व बुधवारी अशा दोन दिवसांत प्राप्त अहवालांत सुमारे साडेतेराशे रुग्ण नव्याने आढळून आले आहेत, तर अकराशेपेक्षा अधिक रुग्ण दोन दिवसांत बरेही झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २९ हजारांच्या टप्प्यात आहे, तर बरे झालेल्यांचा आकडाही २१ हजारांजवळ पोहोचला आहे. दोन दिवसांतील १८ रुग्णांच्या मृत्यूने बळींची संख्या ८३१ झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात ‘कोरोना’चा विळखा अधिकच घट्ट होत आहे. जळगाव शहरातील स्थिती अत्यंत वाईट असून, दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातही ‘कोरोना’चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारच्या ५४१ नव्या बाधितांनंतर आज तब्बल ८०१ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २८ हजार ९३३ झाली आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असून, ती दिलासादायक बाब आहे. मंगळवारी आणि बुधवारी, अशा दोन्ही दिवसांत ११०० रुग्ण बरे झाल्याने हा आकडा २० हजार ८३० झाला आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार, गेल्या २४ तासांत नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात ४९ वर्षीय रुग्णाव्यतिरिक्त इतर सर्व रुग्ण ५० वर्षांवरील आहेत. 

धरणगाव तेराशेच्या टप्प्यात 
धरणगाव : तालुक्यात ऑगस्टमध्ये सुमारे आठशे रुग्णांची वाढ होऊन एकूण रुग्णसंख्या १२९९ झाली आहे. पैकी १०४२ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर- १९३, जळगाव ग्रामीण- ३८, भुसावळ- ६९, अमळनेर- ५१, चोपडा- ८२, पाचोरा- ८, भडगाव- ६, धरणगाव- २१, यावल- २०, एरंडोल- १२८, जामनेर- ६२, रावेर- २०, पारोळा- १७, चाळीसगाव- ५४, मुक्ताईनगर- २, बोदवड- २२, अन्य जिल्ह्यांतील- ८. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT