oxigen
oxigen 
जळगाव

ऑक्‍सिजनचा जादा वापर करणाऱ्यांवर होणार कारवाई

देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी जादा ऑक्सिजन काेणी वापरू नये त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. खासगी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण त्यांना लागणार ऑक्सिजन याची गणित करूनच संबंधित खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यामुळे ऑक्सिजनचा गैरवापरास आळा बसणार आहे. जर असे प्रकार आढळले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. 

जिल्ह्यात पूर्वी ऑक्‍सिजन बेडची संख्या कमी होती. आता ती संख्या वाढली. नंतर ऑक्सिजनचा पूरवठा कमी होवू लागला कारण ऑक्सीजनचे गरज असलेले रुग्ण वाढत आहेत. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. दररोज एक गाडीभर ऑक्सिजन लिक्वीड स्वरूपात येत आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. 
दररोज कोणत्या हॉस्पिटलला किती ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण दाखल आहेत. त्याचा आढावा घेवून आठवडाभर पुरेल एवढा ऑक्सिजन त्यांना पुरवठा होतो. रुग्ण कमी झाले तर ऑक्सिजन शिल्लक राहील, वाढले तर आणखी लागेल. यासाठी एक यंत्रणाच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यान्वित केली आहे. ती रोज रुग्ण संख्या, लागणारा आॅक्सीजन, शिल्लक ऑक्सिजन याचे गणित मांडून ऑक्सिजन सिलिंडर पुरवते. 

गणित ठरलेले.. 
सर्वसाधारण कक्षातील रुग्णाला सात लीटर ऑक्सिजन प्रतीमिनीट लागते. अतीदक्षता कक्षातील रुग्णालयात १३ लीटर प्रतिमिनिट याप्रमाणे ऑक्सिजनचे प्रमाण ठरलेले आहे. त्याप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा होतो. जर रुग्णाला गरजेपेक्षा अधिकचा पुरवठा होत नाही ना याचीही खात्री केली जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT