lockdown
lockdown  
जळगाव

जळगाव लॉकडाउन : सात जुलैपासून काय असेल बंद व सुरू 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता व भविष्यात कोरोनाचा भविष्यात होणारा विस्फोट पाहता जिल्हा प्रशासनाने 7 ते 13 जुलैपासून जळगाव महापालिका क्षेत्र, भुसावळ, अमळनेर पालिका क्षेत्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज घेतला आहे. सात जुलैच्या पहाटे पाचपासून 13 जुलैच्या रात्री बारापर्यंत लॉकडाउनचे आदेश असतील. 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अधिक तिव्रतेने पसरत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून पुर्णतः लॉकडाउन करणे अत्यावश्‍यक झाल्याने आदेश काढण्यात आले आहेत. आदेशानुसार ठरलेल्या कालावधीत नागरीकांना फक्‍त दोन किमी परिसरातील औषधी, दुध घेण्यासाठी परवानगी असेल. नागरीकांना दुकाची, तिनचाकी, चारचाकी वाहने वापरण्यास देखील बंदी आहे. एमआयडीसीतील कंपन्यांसाठी होणारी वाहतुक केवळ सुरू राहणार आहे. जळगाव, भुसावळ व अमळनेर शहर वगळता ग्रामीण भागात व इतर पालिका क्षेत्रात सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत. 

घ्यावी लागणार परवानगी 
जळगाव, भुसावळ, अमळनेर येथील बाजार समितीत केवळ घाऊक व ठोक विक्रीचे व्यवहार सुरू राहतील. किरकोळ खरेदी विक्री करणाऱ्यांना बाजार समितीत परवानगी असणार नाही. रूग्णांना डॉक्‍टरांची गरज असेल तरच वास्तव्यास असलेल्या प्रभागाच्या बाहेर जाता येणार आहे. शेतीच्या कामांसाठी बि- बियाणे, किटकनाशके खरेदी करणे यासाठी संबंधीत क्षेत्राबाहेर जाता येईल. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा सात-बारा उतारा जवळ बाळगावा लागणार आहे. लॉकडाउन लावण्यात आलेल्या क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांना फक्‍त अत्यावश्‍यक सेवांच्या व्यक्‍तींना पेट्रोल, डिझेल विक्रीची परवानगी आहे. 

हे असेल बंद 
लॉकडाउनच्या काळात किराणा दुकान, लिकर शॉप, सलुन दुकाने, खासगी कार्यालय, कुरिअर, इलेक्‍ट्रिशियन, प्लंबर, गॅरेज/वर्कशॉप आदी दुकाने उद्याने बंद राहतील. 

हे असेल सुरू 
मेडिकल स्टोअर, हॉटेल/रेस्ट्रॉरंट (पार्सल सुविधा), ओपीडी, दुध खरेदी विक्री केंद्र, कृषी संबंधीत कामे, कृषी केंद्र, शासकिय कार्यालय, बॅंका, पोस्टल सेवा, 

इतर क्षेत्रात हे असेल सुरू 
जळगाव, भुसावळ, अमळनेर वगळता इतर क्षेत्रात प्रवाशी वाहतुक, बस, टॅक्‍सी, रिक्षा, चारचाकी- दुचाकी वाहने, हॉटेल रेस्ट्रारंट (पार्सल सुविधा), मेडिकल स्टोअर, ओपीडी, भाजीपाला- फळे, दुध खरेदी विक्री, कृषी संबंधीत कामे, कंपनी, शासकिय व खासगी बांधकाम, कृषी सेवा केंद्र, किराणा दुकान, लिकर शॉप, सलून, खासगी व शासकिय कार्यालय., बॅंका, कुरिअर, गॅरेज, वर्कशॉप, उद्याने सुरू असतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT