जळगाव

जळगाव जिल्ह्यातील शहरी भागातील दोन लाखांवर नागरिकांची तपासणी 

देविदास वाणी

जळगाव ः कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत गेल्या पाच दिवसांत जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील दोन लाख ६८ हजार ४०५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील शहरी भागात पालिका प्रशासनाच्या वतीने २६३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्यसेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान ५० घरांना भेटी देणार आहेत. हे पथक घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन, कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भात करणार असून, तेथे कोविड १९ च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येऊन पुढील उपचार केले जाणार आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, सावदा, रावेर, यावल, वरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर व शेंदूर्णी या १८ नगरपालिका/नगरपंचायतीमधील २६३ आरोग्य पथकांनी या मोहितेतंर्गत आतापर्यंत ६३ हजार २ घरांना भेट देऊन दोन लाख ६८ हजार ४०५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. झालेल्या तपासणीनुसार ५० वर्षे वयावरील व्यक्तींची संख्या ६३ हजार ३८ इतकी असून, यामध्ये ३२ हजार ३५ पुरुषांचा तर ३१ हजार ४३ महिलांचा समावेश आहे. 


महापालिका क्षेत्रात या तपासणीत ९ हजार ५८० कोमार्बिड रुग्ण, सर्दी, ताप, खोकला चे ३८१ तर सारीचे ८८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३८६ संशयितांचे आरटीपीसीआरद्वारे स्वॅब घेण्यात आले आहेत. २३० संशयितांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली आहे. 
- जनार्दन पवार, 
पालिका प्रशासन अधिकारी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT