जळगाव

कोरोनाचा कहर सुरूच…बारा जणांचा कोरोनामुळे मत्यू !

सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग वाढतच असून आजही पुन्हा ३८५ नवे बाधित आढळून आले. एरंडोलसारख्या ठिकाणी तब्बल ७१ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. गेल्या २४ तासांत पुन्हा १२ जणांचा बळी गेला अून २५२ रुग्ण बरेही झाले आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख चढताच आहे. दररोज दोन-तीनशेच्या घरात नवे बाधित आढळून येत आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांच्या आकड्याने त्रिशतक पार केले. दिवसभरात ३८५ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १२हजार ७६६ झाली आहे. तर २५२ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ९४५ वर पोचली आहे. गेल्या २४ तासांत १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूसंख्या ५७६ झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांत सर्व पन्नाशीच्या वरील वयोगटातील आहेत. 


असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण १४, अमळनेर ३८, भुसावळ १८, चोपडा ३२, पाचोरा ३२, भडगाव ७, धरणगाव ३८, यावल ४, एरंडोल ७१, जामनेर ३२, रावेर ३, पारोळा ४, चाळीसगाव १५, बोदवड १. 


संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT