जळगाव

कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज विक्रमी सहाशे दहा जण झाले कोरोना मुक्त

भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून गेल्या दोन दिवसापासून सातशेच्या वर बाधित आढळत होते. परंतू आज नवे कोरोना बाधित आढळण्यापेक्षा बरे झालेल्याची संख्या जास्त आली आहे. जळगाव जिल्ह्यात आज नविन ५६६ नवे बाधित आढळले आहे. तर ६१० कोरोना मुक्त होवून आपल्या घरी गेले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या २६ हजारांच्या ४३९ झाली आहे. जळगाव शहरातही कोरोनाचा विळखा अधिक वाढत असून आज १४३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत शुक्रवारी पुन्हा नऊ रुग्णांचा बळी गेला. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना कहर सुरू असून प्रशासनाचे सर्व प्रयत्न अपूर्ण पडत आहे. त्यामुळे दररोज विक्रमी संख्या बांधितांची येत आहे. परंतू आज नवे रुग्ण आढळून येण्याऱयांच्या संख्या पेक्षा कोरोना मुक्त होवून बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने समाधानाची बाब आज दिसून आली. प्राप्त अहवालात आज ५६६ नवीन बाधित आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या २६ हजार ४३९ झाली आहे. तर शनिवारी बरे झालेल्या संख्या ६१० रुग्णांसह बरे झालेल्यांचा आकडाही १८ हजार ६९८ झाला आहे. गेल्या २४ तासांतील नऊ बळींनी मृत्यू झालेल्यांची संख्या ७९८ झाली आहे. दिवसभरात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्व रुग्ण पन्नस वर्षावरील आहे. 


जळगावात उद्रेक सुरूच
जळगाव शहरात कोरोनाचा विस्फोट सुरूच आहे. दिवसभरात तब्बल १४३ रुग्ण आढळून आले असून, ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी आढळलेले रुग्ण : जळगाव ग्रामीण ४६, भुसावळ ३०, अमळनेर ७४, चोपडा ५१, पाचोरा १०, भडगाव ३६, धरणगाव २४, यावल २३, एरंडोल-सात, जामनेर ४१, रावेर १६, पारोळा २७, चाळीसगाव १८, मुकताईनगर- १०, बोदवड-पाच.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT