जळगाव

कोरोना पॉझेटिव्ह...त्यात चालता येईना, तरी कोविड सेंटरच्या गेटवर ती आली कसी ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव: जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून मृत्यूचे प्रमाण रोखण्यातही प्रशासनाला अपयश आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेली पॉझिटिव्ह वृद्ध महिला रुग्णालयाच्या गेटवर पडून असल्याचा प्रकार आज उघडकीस आल्याने रुग्णालयाच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाचा आज पुन्हा एकदा अनागोंदी कारभार समोर आला आहे. 

एरंडोल येथील वृद्ध महिलेच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर वृद्ध महिला आणि मुलगी देखील पॉझिटिव्ह आली. या तिघांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास ही महिला कोविड रुग्णालयाच्या गेटवर पडून असल्याचे दिसून आले. दरम्यान रुग्णालयाच्या परिसरात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्या कार्यकर्त्याने या वृद्ध महिलेची चौकशी करीत माहिती जाणून घेतली. 
कोरोना बाधित रुग्ण अशा पद्धतीने त्यांच्या वार्डाबाहेर पडत आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

व्हिडिओ काढून पटविली ओळख 
सामाजिक कार्यकर्त्याने या महिलेची चौकशी केली असता. त्या महिलेचा एक व्हिडिओ काढून तो एरंडोल येथील काही मित्रांना पाठविला. त्या मित्रांनी त्या आजीबाईची ओळख पटवून नातेवाइकांकडून अधिकची माहिती जाणून घेतली असता. ती वृद्ध महिलेचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले. कोविड रुग्णालय प्रशासनाने संबंधित वृद्ध महिलेच्या केस पेपरवर बेपत्ता असल्याचा शेरा मारला असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी त्या महिलेला आयसोलेशन वॉर्डात दाखल केले होते. 

ती महिला बाहेर आली कशी? 
कोविड रुग्णालयाच्या गेटवर पडलेल्या महिलेला चालता येत नसल्याने ती महिला स्वतः:हून आयसोलेशन वॉर्डातून चालत बाहेर कशी काय गेली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला हटकले नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. 

रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष 
कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभाराचे प्रकार दररोज उघडकीस येत आहे. आज कोरोना वॉर्डातील पॉझिटिव्ह महिला थेट गेटवर पडलेली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयातील प्रशासनाचे कोरोना वॉर्डाकडे लक्ष नसल्याने तसेच अधिकारी देखील या प्रकारांबाबत अनभिज्ञ असल्याने या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 


"त्या' वृद्ध महिलेला कोरोना वॉर्ड क्रमांक एक मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या महिलेचा मुलगा व नातू देखील पॉझिटिव्ह असल्याने ती मानसिकदृष्ट्या खचली आहे. तसेच त्यांना चालता देखील येत नसल्याने ती महिला घसरत वॉर्डच्या प्रवेशद्वारापर्यंत आली. मात्र हा प्रकार वॉर्डातील कर्मचाऱ्यांचा लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला पूर्ववत वॉर्डात दाखल केले. 
डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

SCROLL FOR NEXT