hotel lunch 
जळगाव

हॉटेल रेस्‍टॉरंटमध्ये जेवायला जाताय; मग आधी नवीन नियम पहा

देविदास वाणी

जळगाव : जिल्‍ह्‍यातील हॉटेल- रेस्‍टॉरंट सुरू करण्याचे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले होते. परंतु कोरोना व्हायरसचा वाढता उद्रेक लक्षात घेवून हॉटेलमध्ये जेवण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळे खवय्यांचा हिरमोळ होणार आहे. हॉटेलमध्ये जेवल्‍यास मालक आणि ग्राहकांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्‍याचे सुधारीत आदेश आज जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले.


शहरासह जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृह चालकांना केवळ पार्सल सुविधा देण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तेथे बसून किंवा उभे राहून खाण्यास परवानगी नाही. जर तेथे ग्राहक खाताना आढळल्यास साथ प्रतिबंधकात्मक कायद्यान्वये संबंधित हॉटेल, रेस्टॉरेटचा मालक व ग्राहकांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिला आहे. 

जिल्‍हा रेडझोनमध्ये
जिल्हा कोरोना संसर्गाच्या ‘रेड झोन’मध्ये आहे. यामुळे राज्य शासनाने हॉटेल, रेस्टॉरंटला शंभर टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी शहरासह जिल्ह्यात अशी परवानगी नाही. केवळ हॉटेल, रेस्टॉरंटवर पार्सलद्वारे व्यवहार करण्यास परवानगी आहे. तेथे बसून किंवा उभे राहून खाण्यास नाही. जर कोणत्याही ठिकाणी असे आढळून आले, तर संबंधित दोघांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होणार आहे. 

नास्‍त्‍याच्या गाड्या झाल्‍या होत्‍या सुरू
जळगाव शहरातील मार्केट सुरू झाल्‍यानंतर शहरातील रस्‍ते तसेच चौकांमध्ये नास्‍त्‍याच्या गाड्या सुरू झाल्‍या होत्‍या. शिवाय पाणी पुरीच्या गाडी देखील लावण्यास सुरवात झाली होती. या नास्‍त्‍याच्या गाड्यांवर खाणाऱ्यांची गर्दी झालेली पाहण्यास मिळत होती. मात्र जिल्‍हाधिकारी यांनी काढलेल्‍या नवीन आदेशामुळे नास्‍ता सेंटर बंद करावे लागणार आहेत. सुरू राहिले तरी तेथून केवळ पार्सलची सुविधा करावी लागणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT