corona breaking
corona breaking 
जळगाव

बापरे...कोरोनाचा पुन्हा अडीचशेचा आकडा; सहा जणांचा मृत्यू   

राजेश सोनवणे

जळगाव : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग अजूनही थांबण्याचा नाव घेत नाही. जिल्ह्यातील मोठे हॉटस्पॉट असलेल्या तीन शहरांमध्ये पाच दिवसांपासून लॉकडाउन सुरू असताना देखील त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आज दिवसभरात जिल्ह्यात आढळून आलेल्या 253 पॉझिटीव्ह संख्येमुळे पाहण्यास मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या वाढत्या आकड्यांचा आलेख उंचावतच आहे. 
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्‍यात येण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील वाढत्या रूग्ण संख्येवर अंकुश मिळविणे अद्याप तरी शक्‍य झालेले नाही. या संपुर्ण आठवड्यातील दोन दिवस सोडले तर अन्य दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हा सरासरी अडीचशे इतका निघाला आहे. आज देखील जिल्ह्यात एकूण 253 कोरोना बाधित आढळून आले असून, आतापर्यंत जिल्ह्यात 5 हजार 724 वर कोरोना बाधितांचा आकडा पोहचला आहे. 

लॉकडाउनचा परिणाम दिसणार का? 
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखून साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरासह अमळनेर व भुसावळ पालिका परिसरात सात दिवसांचा लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. लॉकडाउनचा आज पाचवा दिवस असून आता अवघे दोन दिवस बाकी राहिले आहेत. सात दिवसांचा लॉकडाउन घेतल्यानंतर त्याचा परिणाम कधी दिसणार हा एक प्रश्‍न अजून तरी सुटलेला नाही. मुळात लॉकडाउनच्या पुर्वीचे दोन दिवस मार्केटमध्ये झालेल्या गर्दीचा परिणाम म्हणून आणखी दोन दिवस तरी बाधितांचा येणारा आकडा मोठा असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
 
जळगाव शहरात 65 रूग्ण 
जिल्ह्यातील विचार केला असताना जळगाव शहराची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. रोज येणाऱ्या पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण हे जळगाव शहरातील आढळून येत आहेत. आज देखील शहरात 65 कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून, आतापर्यंत शहरात 1 हजार 337 रूग्ण संख्या झाली आहे. 

जिल्ह्यातील आजची स्थिती 
जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 65 , जळगाव ग्रामीण 13, भुसावळ 20, अमळनेर 1, चोपडा 12, पाचोरा 8, धरणगाव 9, यावल 2, एरंडोल 3, जामनेर 30, रावेर 21, पारोळा 12 , चाळीसगाव 26, मुक्ताईनगर 19, बोदवड 12 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात सहा बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रावेर तालुक्‍यातील 2, जामनेर, पाचोरा, यावल आणि चाळीसगाव तालुक्‍यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT