corona  
जळगाव

चिंताजनक...अकरा जणांचा दिवसभरात मृत्यू; साडेचार हजाराचा टप्पा पुर्ण

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात 156 कोरोना बाधीत नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या 4 हजार 586 झाली आहे. तर दुसरीकडे हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात 56 रुग्ण आढळून आल्याने जळगाव शहरातील बाधितांचा आकडा एक हजाराच्या वर पोहचला आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये चिंताजनक परिस्थितीत असलेल्या एकूण 11 जणांचा आज मृत्यू झाला आहे.


जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण वाढतेच आहे. नव्या कोरोना बाधितांमुळे जिल्ह्यात नवीन कंटेटमेंट झोनमध्ये देखील वाढ होत आहे. इतकेच नाही तर नवीन परिसरांची देखील यात भर होत आहे. कोरोनाची साखळी मोडीत काढण्यासाठी लॉकडाउन पुकारण्यात आला असला तरी गेल्या तीन चार दिवसांमध्येच जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पाचशे ते सहाशेंनी वाढला आहे. यामुळे आता लॉकडाउननंतर जिल्ह्यात किती प्रमाणात कोरोना रोखला जातो हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

साडेचार हजाराचा पल्ला पार 
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज यात आणखी 156 रूग्णांची भर पडली आहे. नवीन रूग्णांमुळे जिल्ह्यात साडेचार हजार रूग्णांचा टप्पा गाठला गेला असून एकूण 4 हजार 586 इतकी संख्या झाली आहे. वाढत्या संख्येमुळे कोरोना हॉस्पिटलमध्ये देखील बेड अपुर्ण पडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू 
कोरोनाची लागण झालेल्यांना बरे करण्यासाठी युद्ध पातळीवर उपचार सुरू आहे. परंतु, प्रतिकारशक्‍ती कमी असलेल्या रूग्णांना अधिक त्रास होवून त्यांचा मृत्यू होत आहे. अशा कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये चिंताजनक परिस्थितीत असलेल्या एकूण 11 जणांचा आज मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील 1, चाळीसगाव, एरंडोल व यावल तालुक्‍यातील प्रत्येकी 2, पारोळा, भुसावळ, भडगाव, रावेर या तालुक्‍यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 282 वर पोहचली आहे. 

असे आढळले रूग्ण 
आज नव्याने 156 रूग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहर 56, जळगाव ग्रामीण 18, भुसावळ 12, अमळनेर 7, चोपडा 8, पाचोरा 4, भडगाव 3, धरणगाव 7, यावल 3, एरंडोल 1, जामनेर 13, रावेर 12, मुक्ताईनगर 10 , बोदवड 1 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

Latest Marathi News Live Update : डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT