corona virus update 
जळगाव

जळगाव जिल्‍ह्यात कोरोनामुळे अठरा जणांचा मृत्‍यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताच आहे. जिल्‍ह्‍यातील बाधितांचा आकडा आता ४२ हजार ५५९ वर पोहचला असून, कोरोनामुळे मृत्‍यू होण्याचे प्रमाण देखील कमी होत नाही. जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात अठरा जणांचा मृत्‍यू झाल्‍याने एकूण मृतांची संख्या १ हजार ६१ वर झाली आहे. हा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे.
जिल्‍ह्‍यात कोरोना व्हायरसचा पहिला रूग्‍ण आढळून येण्यास साडेपाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. या साडेपाच महिन्यात जिल्‍ह्‍याची चिंता रोजच वाढत राहिली. सध्याच्या स्‍थितीला सर्वच खुले झाल्‍याने नागरीकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे आकडा देखील त्‍या पटीने वाढत आहे. जिल्‍ह्‍यात बाधितांचा आकडा रोज सातशे- आठशेच्यावर येत आहे. यामुळे पाच हजार रूग्‍णांचा टप्पा गाठण्यास केवळ तीन- चार दिवस लागत आहेत. आज देखील जिल्‍ह्‍यात एकूण ७०३ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. अशा परिस्‍थितीमुळे जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांची संख्या ४२ हजार ५५९ वर पोहचली असून यातील ३१ हजार ५०३ रूग्‍ण बरे होवून घरी गेले आहेत.

जळगावात सर्वाधित मृत्‍यू
जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, यात जळगाव शहराची स्‍थिती अधिक बिकट आहे. कारण एकूण बाधितांमध्ये जळगाव शहरात ९ हजार ५१८ बाधित आढळून आले आहेत. तुलनेत मृत होणाऱ्यांची संख्या देखील जळगाव शहरात सर्वाधित आहे. आज दिवसभरात जिल्‍ह्‍यात १८ जणांचा मृत्‍यू झाला असून, यात जळगाव शहर ४, भुसावळ ३, पाचोरा ३, चोपडा व बोदवड १ आणि एरंडोल, जामनेर व रावेर प्रत्‍येकी दोन जणांचे मृत्‍यू झाले आहेत. यामुळे एकूण मृतांची संख्या ही १ हजार ६१ झाली असून जळगाव शहरात २२० जणांचा मृत्‍यू झाले आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १०३, जळगाव ग्रामीण २५, भुसावळ ४९, अमळनेर ७०, चोपडा ९९, पाचोरा ३०, भडगाव २०, धरणगाव २७, यावल १४, एरंडोल ६५, जामनेर ९३, रावेर १५, पारोळा ८, चाळीसगाव २७, मुक्‍ताईनगर २२, बोदवड ३२ आणि इतर जिल्‍ह्यातील ४ रूग्‍णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT