corona yodha
corona yodha 
जळगाव

फूल नको, आम्हाला द्या वेळेवर वेतन; कोरोनायोद्धाच वेतनापासून वंचित 

सकाळवृत्तसेवा

अडावद : "आम्ही थांबतो कामावर तुमच्यासाठी... मात्र तुम्ही घरी थांबा आमच्यासाठी' असे ब्रीदवाक्‍य घेऊन.. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाला न जुमानता, कोरोनाशी 24 तास झुंज देणारे आरोग्य विभागाचे सर्व आरोग्य कर्मचारी आणि पॅरामेडिकलच्या जळगाव जिल्ह्यातील दीड हजार कर्मचाऱ्यांना फुलांच्या वर्षावापेक्षा किंवा नुसते थाळी वाजवून कोरोनायोद्‌ध्याचे पोट नाही भरत, तर वेतनदेखील पाहिजे, अशी प्रशासनाला दर महिन्याला आर्त हाक द्यावी लागत आहे. मात्र ढिम्म प्रशासन यात कुठलाही बदल करीत नसल्याचे चित्र आहे. 
जिल्ह्यात सुमारे दीड हजार आरोग्य व पॅरामेडिकल कर्मचारी कोरोनाशी दोन हात करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे दरमहा होणारे वेतन. तेच जर उशिराने होत असेल तर मग घरातील प्रपंच कसा चालेल, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. जिल्हा परिषद किंवा अन्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन होते. मात्र, आरोग्य विभागावर अन्याय का, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. शासकीय कर्जाचे हप्ते, विमा, गृहकर्ज, मुलांची फी, औषधोपचार खर्च, घरभाडे, किराणा, दूध इत्यादी देणे दर महिन्याला क्रमप्राप्त आहे. शासन किंवा प्रशासन आरोग्य कर्मचारी वर्गाकडून फक्त कामाची अपेक्षा ठेवते, त्याप्रमाणे नुसतेच कर्मचाऱ्यांवर फुले उधळून किंवा थाळी वाजवून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यापेक्षा त्यांचे मासिक वेतन वेळेवर कसे होईल, याची काळजी करावी, अशी माफक अपेक्षा कर्मचारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. 


आरोग्य विभाग दृष्टिक्षेपात 
आरोग्यसेवक : 271 
आरोग्य सहाय्यक : 99 
आरोग्य सहाय्यिका : 76 
आरोग्यसेविका : 389 
औषधनिर्माण अधिकारी : 77, 
अर्धवेळ स्त्री-परिचारिका : 352 
शिपाई (अंदाजे) : 158 
स्विपर : 69 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT