corona update
corona update 
जळगाव

corona update बारा हजाराचा पल्‍ला पार; कोरोनाचे नवीन २८३ बाधित 

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना बरे होण्याची संख्या देखील त्‍याच तुलनेत येत आहे. तरी देखील आज नव्याने २८३ कोरोना बाधितांची भर पडली असून जिल्‍ह्‍यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा बारा हजारांच्या पार गेला आहे. यामुळे एकूण संख्या १२ हजार ३६ झाली आहे. 
जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. शिवाय, अनलॉक ३ सुरू झाल्‍याने रस्‍त्‍यांवर आणि दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्‍याचे कारण देखील आकडा वाढण्यामागे असू शकते. प्रामुख्याने जळगाव शहराची स्‍थिती अतिशय गंभीर होत चालली असून, शहरातील आकडा हा तीन हजार ९७ वर पोहचला आहे. जिल्‍ह्‍यात एकूण नव्याने २८३ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली. सर्वाधिक ९५ कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. 
 
२६६ जणांची कोरोनावर मात 
कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील आता वाढू लागले आहे. दिवसभरात जिल्‍ह्‍यात २८३ रूग्‍ण आढळून आले; तर दुसरीकडे दिवसभरात २६६ रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. यामुळे आतापर्यंत बरे होवून घरी गेलेल्‍यांची संख्या ८ हजार ४६९ वर पोहचली आहे. 

असे आढळले रूग्‍ण 
आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९५, जळगाव ग्रामीण ३३, भुसावळ ३, अमळनेर २४, चोपडा ३४, पाचोरा २, भडगाव ३, धरणगाव ४, यावल १३, एरंडोल २२, जामनेर २४, रावेर ६, पारोळा ५, चाळीसगाव १, मुक्ताईनगर १४ अशी रूग्ण संख्या आहे. 

नऊ जणांचा मृत्‍यू 
कोरोनामुळे आज दिवसभरात ९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव तालुका ३, जळगाव शहर २ तर एरंडोल, पारोळा, भडगाव व यावल तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा मृत्यू आहे. यामुळे एकूण मृतांची संख्या ही ५४९ झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT