corona update 
जळगाव

corona update कोरोनाचे नवे 616 तर बरे झाले 402 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोना व्हायरसचा वाढत्या संसर्गाचे चित्र दिवसेंदिवस अधिकच भयानक होत चालले आहे. विघ्नहर्त्या गणरायाचे आज आगमन झाले असताना सारेजण बाप्पाकडे कोरोनाचे विघ्न दूर करण्यासाठीच प्रार्थना करत आहेत. अशात आज कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला असून दिवसभरात 616 नवे रूग्ण आढळून आले तर 402 रूग्ण बरे होवून घरी गेले. 
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. आजच्या नवीन रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 21 हजार 713 वर पोहचला आहे. यातून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांपैकी 14 हजार 945 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. अर्थात आजच्या स्थितीला 6 हजार 50 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रॅपिड अँटीजन टेस्ट घेतली जात असल्याने आकडा वाढत असला तरी बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक होत चालली आहे. 

गणेश उत्सवाचा परिणाम पुढे 
विघ्नहर्ता गणरायाचे आज उत्साहपुर्ण वातावरणात स्वागत करत प्रतिष्ठापना करण्यात आली. हे करत असताना देशात असलेल्या कोरोना व्हायरसचे विघ्न दूर करण्याची प्रार्थना भाविकांनी केली. असे असले तरी गणेश मुर्ती आणि पुजेसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा परिणामामुळे कोरोना व्हायरसची लागण झाल्याने वाढलेला आकडा पुढील आठवड्यात दिसून येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 


असे आढळले रूग्ण 
जळगाव शहर 101, जळगाव ग्रामीण 34, भुसावळ 30, अमळनेर 42, चोपडा 86, पाचोरा 37, भडगाव 39, धरणगाव 28, यावल 14, एरंडोल 9, जामनेर 36, रावेर 30, पारोळा 52, चाळीसगाव 65, मुक्‍ताईनगर 1, बोदवड 11, इतर जिल्ह्यातील 2 रूग्णांचा समावेश आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT