covid center 
जळगाव

रुग्ण घटले, कोविड सेंटरमधील बेड रिकामे; काळजी आवश्यक 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा आलेख उतरता असून, त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने घसरत आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याने ॲक्टिव रुग्णांची संख्या दोन हजारांच्या आत असून, त्यांपैकी बाराशेवर रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. केवळ साडेसहाशे रुग्णच दाखल आहेत. त्यामुळे कोविड सेंटरमधील बेड रिकामे पडले आहेत. दरम्यान, असे असले तरी नागरिकांनी अद्यापही काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता. जूनपासून ही स्थिती बिकट होत गेली, ती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत. दररोज आठशे-हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत होते. जुलै, ऑगस्टमध्ये हे प्रमाण कमालीचे वाढले. तसेच मृत्युदरही वाढत होता. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पार गेली. सप्टेंबरमध्ये ॲक्टिव रुग्णही दहा हजारांच्या वर गेल्यानंतर बेड मिळणे, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यात पंधरावर खासगी हॉस्पिटलला कोविड उपचारासाठी परवानगी दिली होती. 

महिन्यापासून दिलासा 
सप्टेंबरच्या १७ तारखेपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली. महिनाभरात दररोज आढळून येणारे रुग्ण कमी आणि बरे होणारे अधिक असे चित्र दररोज दिसू लागले आहे. त्यामुळे स्वाभाविकच ॲक्टिव रुग्णांची संख्या कमी झाली. सप्टेंबरमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक असलेले ॲक्टिव रुग्ण आता एक हजार ८८२ एवढे मर्यादित आहेत. त्यांपैकी केवळ ६६२ रुग्ण उपचारार्थ दाखल असून, उर्वरित एक हजार २२० गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे कोविड सेंटरमधील बहुतांश बेड रिकामे झाले आहेत. 

खासगी कोविड सेंटर बंद 
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पंधरापेक्षा अधिक कोविड सेंटर सुरू झाली होती. तीदेखील आता रुग्ण नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने बंद होऊ लागली आहेत. सध्या ही संख्या दहाच्या आत असून, जळगाव शहरात तर तीन-चारच खासगी कोविड सेंटर शिल्लक आहेत. 
 
अशी आहे रुग्णांची स्थिती 
एकूण रुग्ण : ५१,८८९ 
बरे झालेले : ४८,७६६ 
ॲक्टिव रुग्ण : १,८८२ 
गृहविलगीकरणातील रुग्ण : १,२२० 
सीसीमध्ये दाखल : १४६ 
डीसीएचसीमध्ये दाखल : २९९ 
डीसीएचमध्ये दाखल : २१७ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT